राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय
भारत एनसीएक्स 2024 ची अभूतपूर्व यशस्वी सांगता : 600 हून अधिक प्रतिनिधींचे प्रशिक्षण, महत्वपूर्ण उपाययोजनांचा आरंभ आणि नवोन्मेषी पद्धतींचे सादरीकरण
Posted On:
02 DEC 2024 8:45AM by PIB Mumbai
भारताच्या सायबर सुरक्षा परिदृश्यातील एक अतिशय महत्वाचा उपक्रम असलेल्या भारतीय राष्ट्रीय सायबर सुरक्षा सराव (भारत एनसीएक्स 2024) कार्यक्रमाची सायबर लवचिकता, सहयोग आणि नवोन्मेष याक्षेत्रात नवीन टप्पे गाठत यशस्वी सांगता झाली. याअंतर्गत 600 हून अधिक प्रतिनिधींना प्रशिक्षण देण्यात आले. या निमित्ताने भारताची सायबरसुरक्षा सज्जता अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने सायबरसुरक्षा क्षेत्रातील व्यावसायिक, धोरणकर्ते, संरक्षण क्षेत्रातील व्यक्ती आणि उद्योग धुरिण एकाच मंचावर येऊ शकले.
या सोहळ्यात दोन प्रमुख टप्पे होते : नॅशनल क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोटेक्शन सेंटर (NCIIPC) च्या महासंचालकांच्या हस्ते राष्ट्रीय सायबर सुरक्षा संदर्भ आराखड्याचा शुभारंभ आणि राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ (RRU) द्वारे स्वदेशात विकसित केलेल्या भारत नॅशनल सायबर रेंज 1.0 चे उद्घाटन. याशिवाय भारत सीआयएसओ संमेलन आणि भारतीय सायबर सुरक्षा स्टार्टअप प्रदर्शन या उपक्रमांनी धोरणात्मक संवादासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले तसेच सायबर सुरक्षा क्षेत्रातील स्पर्धात्मक युगातील नवनवीन कल्पनांचे सादरीकरण देखील करण्यात आले.
भारताच्या डिजिटल सीमा सुरक्षित करण्यासाठी भारत NCX 2024 हा एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम असल्याचे एकात्मिक संरक्षण स्टाफचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जॉन्सन पी. मॅथ्यू, यांनी या सांगता समारंभात अधोरेखित केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी केलेल्या एकत्रित प्रयत्नाचे त्यांनी कौतुक केले आणि सातत्यपूर्ण नवोन्मेष आणि सायबरसुरक्षा क्षेत्रातील दूरदृष्टीवर भर दिला. भारत NCX 2024 च्या यशस्वी आयोजनामागे 600 पेक्षा अधिक प्रतिनिधींचे प्रशिक्षण, भारत सीआयएसओ संमेलन यांचा समावेश महत्वपूर्ण ठरला तसेच भारतीय सायबर सुरक्षा स्टार्टअप प्रदर्शन आणि भारत नॅशनल सायबर रेंज 1.0 या उपक्रमांमुळे भारताच्या सायबर सुरक्षा प्रवासातील एक परिवर्तनकारी घटना म्हणून आपले स्थान मजबूत केले आहे.
भारत NCX 2024 ची सांगता झाली असली तरी या कार्यक्रमाने सहकार्य, नवोन्मेष आणि मजबूत राष्ट्रीय सज्जता यांचा वारसा मागे ठेवला असून सुरक्षित आणि आत्मनिर्भर डिजिटल भारताचा मार्ग खुला केला आहे.
***
JPS/BS/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2079639)
Visitor Counter : 77