पंतप्रधान कार्यालय
डॉ. पृथ्वीन्द्र मुखर्जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला शोक व्यक्त
प्रविष्टि तिथि:
30 NOV 2024 9:13PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. पृथ्वीन्द्र मुखर्जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. डॉ. मुखर्जी हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते आणि त्यांना संगीत तसेच काव्याचीही आवड होती, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावर म्हटले आहे :
डॉ. पृथ्वीन्द्र मुखर्जी हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते, त्यांनी प्रतिभावंतांच्या विश्वात आपला गडद ठसा उमटवला होता. संगीत आणि काव्याचीही त्यांना आवड होती. त्यांचे कार्य आणि रचना सदैव प्रशंसेला पात्र राहतील. भारताच्या इतिहासाचे जतन करण्यासाठी, विशेषत: स्वातंत्र्य लढ्याच्या वेळचा इतिहास जतन करण्यासाठी तसेच भारत आणि फ्रान्समधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्नही तितकेच उल्लेखनीय होते. त्यांच्या जाण्याने अतिव दु:ख झाले. त्यांचे कुटुंबीय आणि मित्र परिवाराप्रती संवेदना. ॐ शांती
***
N.Chitale/T.Pawar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2079464)
आगंतुक पटल : 83
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam