महिला आणि बालविकास मंत्रालय
महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या अधिकार प्राप्त समितीने परदेशात संकटात असलेल्या भारतीय महिलांसाठी 9 वन स्टॉप सेंटरसाठीच्या प्रस्तावांना दिली मंजुरी
Posted On:
29 NOV 2024 4:24PM by PIB Mumbai
परदेशात अडचणीत असलेल्या भारतीय महिलांसाठीच्या मदतीकरिता 9 वन स्टॉप सेंटरसाठी (ओएससीएस) परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रस्तावांना महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या अधिकार प्राप्त समितीने मंजुरी दिली आहे. यामध्ये बहारीन, कुवेत, ओमान, कुवैत, युएई, सौदी अरेबिया (जेद्दा आणि रियाध) येथील 7 वन स्टॉप सेंटरसाठी आश्रयगृहांची व्यवस्था आहे, तसेच टोरांटो आणि सिंगापूर येथील 2 वन स्टॉप सेंटरसाठी आश्रयगृहांची व्यवस्था नाही. परराष्ट्र मंत्रालयाने आता या 9 दुतावासांसाठी बजेट लाइन सुरू केली आहे.
भारतीय समुदाय कल्याण निधी(आयसीडब्ल्यूएफ) ची स्थापना परदेशातील सर्व भारतीय दूतावास आणि केंद्रामध्ये करण्यात आली आहे.ज्यायोगे हा निधी परदेशातील भारतीय नागरिकांसाठी विविध ऑन-साईट कल्याणकारी उपक्रमांच्या खर्चाची व्यवस्था करण्यासाठी वापरला जाईल. आयसीडब्ल्यूएफच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये 1 सप्टेंबर 2017 पासून व्यापकपणे सुधारणा करण्यात आली आहे. सुधारित मार्गदर्शक तत्वांमुळे अडचणीत असलेल्या भारतीय नागरिकांसाठी त्यात ही विशेषतः महिलांसाठी, कल्याणकारी उपक्रमांची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे, जी या निधीद्वारे पूर्ण करता येईल.
ही माहिती महिला आणि बालविकास राज्य मंत्री सावित्री ठाकूर यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.
***
N.Chitale/G.Deoda/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2079161)
Visitor Counter : 9