ऊर्जा मंत्रालय
सौभाग्य अंतर्गत घरांचे विद्युतीकरण
Posted On:
28 NOV 2024 4:25PM by PIB Mumbai
ग्रामीण भागामध्ये विद्युतीकरण न झालेल्या कुटुंबांना आणि शहरी भागातील सर्व इच्छुक गरीब कुटुंबांना वीज जोडणी देण्यासाठी सार्वत्रिक घरगुती विद्युतीकरण साध्य करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने ऑक्टोबर 2017 मध्ये ‘ प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना’ (सौभाग्य) देशामध्ये सुरू केली.
या संदर्भामध्ये राज्यांच्या अहवालानुसार, सौभाग्य योजना सुरू झाल्यापासून, 31.03.2022 पर्यंत सुमारे 2.86 कोटी घरांचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. महाराष्ट्र राज्यासाठी, एकूण 5,89,242 घरांचे विद्युतीकरण करण्यात आले. यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील ग्रीडद्वारे अनुक्रमे 5,42,914 आणि 15,790 कुटुंबांना वीजजोडणी देण्यात आली. त्याचबरोबर ‘ऑफ-ग्रीड मोड’ द्वारे ग्रामीण भागातील 30,538 कुटुंबांना वीज देण्यात आली आहे. सौभाग्य योजनेअंतर्गत मंजूर केलेली सर्व कामे पूर्ण झाली आहेत आणि ही योजना 31.03.2022 रोजी बंद केली आहे. सुधारित वितरण क्षेत्र योजना (आरडीएसएस) अंतर्गत, पीएम- जनमन (प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान आणि डीए-जेजीयूए (धरती आबा जनजाती गरम उत्कर्ष अभियान ग्राम) अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील 9,036 घरांच्या विद्युतीकरणाची कामे मंजूर करण्यात आली आहेत.
भारत सरकारने आरडीएसएस योजनेचा प्रारंभ जुलै 2021 मध्ये केला होता. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट डीस्कॉम/ उर्जा विभाग यासारख्या वितरण सुविधांना पाठिंबा देणे हे आहे. वितरण क्षेत्राची कार्यक्षमता आणि आर्थिक स्थिरता यामध्ये सुधारणा व्हावी, जेणेकरून वीज पुरवठा कामामध्ये गुणवत्ता आणि विश्वासार्हता प्रदान करता येईल.
यासंदर्भामध्ये केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहर लाल यांनी आज लोकसभेत उत्तर दिले.
***
N.Chitale/S.Bedekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2078571)
Visitor Counter : 19