माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav
iffi banner

55 व्या इफ्फीमध्ये जगभरातील दिग्दर्शकांकडून ओळख, लवचिकता आणि मुक्तीच्या जागतिक कथा अधोरेखित


भूतान, अल्बेनिया आणि इराणमधील वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक कथा आंतरराष्ट्रीय पॅनोरमा विभागात जिवंत केल्या गेल्या

"भूतान हा आनंदाचा देश असेलही परंतु प्रत्येक कथेला संघर्षाची गरज असते ,अगदी स्वर्गातही" - चार्मी चेड्डा

"इतिहासाचे व्रण प्रत्येक कुटुंबावर कोरलेले असतात ; लुना पार्क ही त्या कथांना श्रद्धांजली आहे" - फ्लोरेंक पापास

"गर्दीमध्येही एखाद्या व्यक्तीला अगदी एकटे वाटू शकते. हा आपल्या काळातील विरोधाभास आहे" - मन्सूर वोसोघी

#IFFIWood, 27 नोव्‍हेंबर 2024

 

55 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात, आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मात्यांनी आंतरराष्ट्रीय पॅनोरमा विभागांतर्गत भूतान, अल्बानिया आणि इराणमधील वैशिष्ट्यपूर्ण कथांवर प्रकाश टाकणारे तीन विचारप्रवर्तक चित्रपट प्रदर्शित केले. चार्मी चेड्डा, फ्लोरेंक पापास आणि मन्सूर वोसोघी या दिग्दर्शकांनी जागतिक प्रेक्षकांना त्यांच्या गहन  वैयक्तिक कथांची ओळख करून दिली, त्यातील प्रत्येक कथेने विशिष्ट संस्कृती आणि मानवी अनुभवांचे दर्शन घडवले.

चार्मी चेड्डा यांचा 'विथ लव्ह फ्रॉम भूतान' प्रेक्षकांना कौटुंबिक संबंध, सांस्कृतिक ओळख आणि जेवणाच्या माध्यमातून प्रेम व्यक्त करण्याच्या अनोख्या भुतानी पद्धतीद्वारे एका भावनिक प्रवासाला घेऊन जातो. हा चित्रपट  जिमी या खाद्य  मानववंशशास्त्राच्या विद्यार्थ्याची कथा सांगतो जो दोन दशकांनंतर भूतानला परतला आहे आणि त्याची सावत्र बहीण यांग चेनशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो. चेड्डा यांनी देशाची घनिष्ठ वीण असलेला  समाज आणि विकसित होत असलेली संस्कृती यांचा कथानकावर  कसा प्रभाव पडला हे अधोरेखित केले. उत्कटतेने कथा सांगण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या या दिग्दर्शकाने भूतानच्या उदयोन्मुख सिनेमाबद्दल आणि यातील आशय सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी इफ्फीसारख्या व्यासपीठाची गरज याबद्दल भरभरून सांगितले.

चार्मी चेड्डा यांनी भूतानच्या नवोदित मात्र ऊर्जाशील चित्रपट उद्योगाविषयी देखील सांगितले आणि कथा सांगण्याच्या अनोख्या संधींवर भर दिला. भूतानच्या संस्कृतीत "प्रेम" साठी थेट शब्द नाही, त्यामुळे भावना व्यक्त करण्यासाठी जेवण हे एक मध्यवर्ती माध्यम बनते असे तिने नमूद केले  - ही संकल्पना तिच्या चित्रपटाचे मुख्य सार  आहे. "विथ लव फ्रॉम भूतान" प्रेम, संघर्ष आणि सांस्कृतिक ओळख यांचे मिश्रण असलेल्या  भूतानच्या समाजाचे सार जिवंत करतो " असे चार्मी चेड्डा म्हणाली.

फ्लोरेंक पापासचा 'लुना पार्क'  हा अल्बेनियातील 1997 मधील कम्युनिस्ट अशांततेनंतरचा एक गंभीर व्यक्ती विषयक अनुभवाने समृध्द चित्रपट आहे. आपल्या बालपणीच्या आठवणींनी प्रेरित होऊन, पापास यांनी एका माता आणि मुलाची एक मार्मिक कथा लिहिली आहे जी एका राष्ट्राला उध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर नेत आहे. हा चित्रपट या अशांत काळात अल्बानियन कुटुंबांची लवचिकता दाखवतो. जिव्हाळ्याच्या कथाकथनाशी ऐतिहासिक प्रतिबिंब एकत्र केले आहे.  फ्लोरेंक पापास, ज्यांचे याआधी त्यांच्या कामासाठी कौतुक झाले आहे, त्यांनी हा चित्रपट केवळ त्यांच्या कुटुंबाच्या प्रवासाचेच नव्हे तर एका पिढीच्या सामूहिक स्मृतींचे प्रतिनिधित्व कसे करतो, हे सामायिक केले. अल्बानियाच्या सर्वात आव्हानात्मक काळात आई आणि तिचा किशोरवयीन मुलगा नागरी हिंसाचारातून पुढे मार्गक्रमण  करताना दाखवले असून  कौटुंबिक बंध आणि सामाजिक अशांततेवर हा चित्रपट प्रकाश टाकतो. ते म्हणाले की "ही कथा वैयक्तिक असली तरी सार्वत्रिक आहे, जी माझ्या स्वत:च्या बालपणातील अनुभवांवर आधारित आहे. यात  अराजकतेच्या पार्श्वभूमीवर कुटुंब आणि व्यक्तींच्या लवचिकतेवर भाष्य केले  आहे."

मन्सूर वोसौघीचा चित्रपट बॅरेन एकाकीपणाने आलेल्या  उदासिनतेमध्‍ये मुक्ततेची  शक्ती शोधते.  इराणी नाट्यामध्‍ये  याह्याचे अनुसरण करताना , गूढ भूतकाळ असलेल्या माणसाची भेट एका हुशार युवतीशी होते. यामध्‍ये ती युवतीच  त्याला स्‍वत:मधील  राक्षसी वृत्तीचा  सामना करण्यास मदत करते. वोसौघी  यांनी या चित्रपटाचे वर्णन आधुनिक विलगीकरणामध्‍ये  ध्यानस्‍थ  होणे  असे केले आहे.  यामध्‍ये  मानवी स्थिती प्रतिबिंबित करण्यासाठी भूगोलाच्या पलीकडे कसे गेले जाते,  यावर जोर दिला. त्यांनी इराणमधील स्वतंत्र चित्रपट निर्मितीच्या आव्हानांवरही प्रकाश टाकला आणि अशा सृजनशील स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित केले.

विनाटपाची, भंगार कारमध्ये राहून आणि पैशासाठी महिलांचे केस कापण्‍याचे काम करीत  जगत असताना, शोषणातून सुटलेली तरुण मुलगी जेव्हा त्याच्या मार्गामध्‍ये येते, तेव्हा याह्याचे आयुष्य बदलते. हा चित्रपट एकाकीपणा, जगण्याची उर्मी  आणि स्वत:चा शोध या विषयांना काव्यात्मकपणे टिपतो. मन्सूर वोसौघी म्हणाले, "हा चित्रपट काही गोष्‍टींमध्‍ये जोडला गेलेला  परंतु एकाकी जगात अनेकांना तोंड द्यावे लागत  असलेल्या मूक लढाया प्रतिबिंबित करतो. याह्याचा प्रवास उजाड, भकास  वातावरणात मुक्तीच्या शोधाचे प्रतीक आहे."

दिग्दर्शकांनी प्रसार माध्‍यमांचे प्रतिनिधही, व्यावसायिक आणि उपस्थितांबरोबर चित्रपटांमागील आव्हाने आणि प्रेरणांबद्दल चर्चा केली. चार्मी चेड्डा यांनी भूतानच्या उदयोन्मुख चित्रपट निर्मिती संस्कृतीवर भर दिला आणि हिमालयातील अस्सल कथा सांगण्याचे महत्त्व अधोरेखित केले. फ्लोरेंक पापासने तिचे चित्रपटाशी असलेले  सखोल वैयक्तिक नाते आणि त्याच्या स्वरूपाविषयी  माहिती  दिली.  हा चित्रपट  तिच्या स्वतःच्या कुटुंबाच्या दृष्‍टीने महत्वाचा आहे आणि अल्बानियाच्या ऐतिहासिक संदर्भाने प्रेरित आहे. मन्सूर वोसौघी यांनी इराणमधील स्वतंत्र चित्रपट निर्मात्यांना भेडसावणाऱ्या अडचणींवर प्रकाश टाकला आहे.  सर्जनशील स्वातंत्र्य आणि आर्थिक मर्यादा यांच्यातील समतोल त्यांनी लक्षात घेतल्याचे स्पष्‍ट केले. वैविध्यपूर्ण कथाकथनासाठी जागतिक मंच म्हणून आपली  भूमिका साजरी करत दिग्दर्शकांनी एकत्रितपणे इफ्फीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यांसारख्या चित्रपटांद्वारे, त्यांनी सांस्कृतिक विभागणी दूर करण्यासाठी आणि प्रेक्षकांना सार्वत्रिक भावनांशी जोडण्यासाठी सिनेमा या माध्यमामध्‍ये   अद्वितीय सामर्थ्य असल्याची पुष्टी केली.

प्रस्‍तुत पत्रकार परिषद पाहण्‍यासाठी येथे क्लिक करावे:

 

* * *

PIB IFFI CAST AND CREW | G.Chippalkatti/Sanjana/Suvarna/Darshana | IFFI 55

iffi reel

(Release ID: 2078515) Visitor Counter : 30