माहिती आणि प्रसारण मंत्रालय
“सुलभता हे एक वैशिष्ट्य नसून ती एक सामाजिक गरज आहे” क्यूब सिनेमा टेक्नोलॉजीज चे सह-संस्थापक सेंथिल कुमार यांचे प्रतिपादन
“यासंदर्भातील कायदा सुस्पष्ट आहे, कालमर्यादा योग्य आहे आणि खर्च देखील खूप नाही”: चित्रपटगृहांमध्ये फिचर फिल्म्सच्या सार्वजनिक प्रदर्शनाच्या वेळी सुलभताविषयक मापदंडांसाठी मार्गदर्शन तत्वे लागू करण्यासंदर्भात सेंथिल कुमार यांचे मत
इफ्फी 2024 दरम्यान ‘चित्रपटगृहांमध्ये फिचर फिल्म्सचे प्रदर्शन: सुलभतेची समस्या’ यावर आधारित मास्टरक्लासचे आयोजन
#IFFIWood, 26 नोव्हेंबर 2024
चित्रपटांचा आनंद घेण्याची दिव्यांग व्यक्तींची गरज पूर्ण करण्यासाठी सरकारने चित्रपटगृहांमध्ये फिचर फिल्म्सच्या सार्वजनिक प्रदर्शनाच्या वेळी सुलभताविषयक मापदंडांसाठी मार्गदर्शन तत्वे अधिसूचित केली आहेत. ही तत्वे सुस्पष्ट आणि सर्वसमावेशक आहेत. “त्यांच्या अंमलबजावणीसाठी देण्यात आलेली कालमर्यादा योग्य आहे आणि याच्याशी संबंधित खर्च देखील अवास्तव नाही,” असे सुस्पष्ट मत. क्युब सिनेमा टेक्नोलॉजीज चे सह-संस्थापक सेंथिल कुमार यांनी आज इफ्फीत व्यक्त केले.
इफ्फी 2024 च्या अनुषंगाने गोव्यातील कला अकादमीत आयोजित केलेल्या ‘चित्रपटगृहांमध्ये फिचर फिल्म्सचे प्रदर्शन: सुलभतेची समस्या’ यावर आधारित मास्टरक्लासमध्ये ते बोलत होते.सेंथिल कुमार चलचित्र कला आणि विज्ञान अकादमीच्या निर्मिती आणि तंत्रज्ञान शाखेचे देखील सदस्य आहेत.

याप्रसंगी बोलताना सेंथिल कुमार यांनी दिव्यांग प्रेक्षकांसाठी चित्रतलवर्णने पुरवण्यातील तांत्रिक आणि सर्जनशील दृष्टीकोनांची चर्चा केली.प्रमाणाबाहेरील कथन दर्शकांचे लक्ष विचलित करू शकते तर अपुरे वर्णन पडद्यावर चाललेल्या बाबी दर्शकांपर्यंत परिणामकारकरीत्या पोहोचू शकत नाहीत याकडे लक्ष वेधत, त्यांनी श्राव्य वर्णनांमध्ये समतोल साधण्याच्या गरजेवर अधिक भर दिला. सामान्यतः, दिव्यांग व्यक्तींसाठी चित्रपटाचा सुमारे 15% भाग श्राव्य वर्णनाद्वारे समजावून सांगितलं जातो.
सर्वांना चित्रपटाचा अनुभव अधिक चांगल्याप्रकारे मिळवता यावा यासाठी तयार करण्यात आलेली चित्रतलवर्णने पुरवणारी साधने आणि श्राव्य वर्णन करणारी साधने यांच्यासह विविध सुलभता वैशिष्ट्यांवर देखील त्यांनी अधिक भर दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्पित केल्या प्रमाणे “दिव्यांगजनांना संधी आणि सुलभता मिळवून देण्यासाठी विशेष लक्ष पुरवले जात आहे. देशातील प्रत्येक व्यक्ती सक्षम व्हावी, समावेशक समाजाची उभारणी व्हावी, समता आणि सहकार्य यांच्या उर्जेने समाजातील एकोपा वाढावा आणि सर्वांची एकत्रितपणे प्रगती व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.” असेही ते म्हणाले.
या संकल्पनेनुसार मार्च 2024 मध्ये केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (एमआयबी) दृष्टी तसेच श्रवण दोष असलेल्या व्यक्तींना चित्रपटाचा लाभ घेता यावा यासाठी चित्रपटगृहांमध्ये फिचर फिल्म्सच्या सार्वजनिक प्रदर्शनाच्या वेळी सुलभताविषयक मापदंडांसाठी मार्गदर्शन तत्वे जारी केली आहेत.
सरकारने लागू केलेल्या या सुलभता संबंधित वैशिष्ट्यांच्या संदर्भातील मार्गदर्शक तत्वांबाबत सेंथिल कुमार यांनी अधिक विस्ताराने माहिती दिली. “सुलभता हे एक वैशिष्ट्य नसून ती एक सामाजिक गरज आहे” सेंथिल कुमार शेवटी म्हणाले.
चित्रपटगृहांमध्ये फिचर फिल्म्सच्या सार्वजनिक प्रदर्शनाच्या वेळी सुलभताविषयक मापदंडांसाठी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करा.
सुलभताविषयक मापदंडांच्या महत्त्वाच्या वैशिष्ट्यांमध्ये खालील बाबींचा समावेश होतो:
दृष्टी तसेच श्रवण दोष असलेल्या व्यक्तींना सुलभतेने चित्रपटाचा आनंद घेता येईल याची सुनिश्चिती करण्यासाठी :
- एकापेक्षा जास्त भाषांमध्ये प्रमाणित केलेल्या सर्व चित्रपटांनी 6 महिन्यांच्या आत आणि इतर सर्व चित्रपटांनी 2 वर्षांच्या आत मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक.
- श्रवणदोष आणि दृष्टिदोष असणाऱ्या प्रेक्षकांसाठी प्रत्येकी किमान एक सुलभता वैशिष्ट्य आवश्यक उदाहरणार्थ. क्लोज्ड कॅप्शनिंग आणि ऑडिओ डिसक्रीप्शन.
- चित्रपटगृहाच्या परवानाधारकांद्वारे नियमित शो दरम्यान चित्रपटगृहामध्ये सानुकूलित उपकरणे किंवा मोबाइल ॲप्स किंवा इतर उपलब्ध तंत्रज्ञान वापरून चित्रपट उपयोजित करण्यासाठी लागणारी सुलभता वैशिष्ट्ये.
- व्यावसायिक कारणांसाठी सिनेमा हॉल किंवा चित्रपटगृहांमध्ये सार्वजनिक प्रदर्शनासाठी असलेल्या चित्रपटांना सुलभता वैशिष्ट्ये लागू.
- सुलभता मानके केवळ चित्रपटाच्या आशयासंदर्भात परिभाषित केलेली नाहीत, तर सहाय्यक उपकरणे आणि चित्रपटगृह पायाभूत सुविधा, श्रवण आणि दृष्टीदोष असलेल्या प्रेक्षकांना चित्रपटगृहात चित्रपटांचा पाहण्याचा आनंद घेण्यासाठी आवश्यक असलेल्या सुलभता वैशिष्ट्यांमध्ये जागतिक सर्वोत्तम पद्धतींचा समावेश करण्यासाठी परिभाषित आहेत.
- अनिवार्य प्रवेशयोग्यता वैशिष्ट्ये: श्रवणदोष आणि दृष्टिदोषांसाठी प्रत्येकी किमान एक प्रवेशयोग्यता वैशिष्ट्य, म्हणजे ऑडिओ डिसक्रीप्शन आणि क्लोज्ड कॅप्शनिंग/ओसी
- "ऑडिओ डिसक्रीप्शन." हे दृष्टिहीन व्यक्तींसाठी चित्रपट पाहण्याचा अनुभव वृद्धिंगत करण्यासाठी चित्रपटातील दृश्य प्रस्तुतींचे श्रवण करण्याजोगे वर्णन आहे. संवादातील अंतरादरम्यान, ते दृश्ये, सेटिंग्ज, क्रिया आणि पोशाख यासारख्या दृश्य घटकांचे वर्णन करते.
- "क्लोज कॅप्शनिंग" हे असे साधन आहे ज्याद्वारे चित्रपटाचे श्राव्य संवाद आणि ध्वनी प्रतिनिधित्व दोन्ही वापरकर्त्याच्या मागणीनुसार ऑन-स्क्रीन मजकूराद्वारे दृश्यमान केले जातात, जे श्राव्य आशयासोबत सिंक्रोनाईझ म्हणजेच समक्रमित केले जाते.
- अतिरिक्त सुलभता वैशिष्ट्ये:
- "भारतीय सांकेतिक भाषा" दुभाष्यांद्वारे भारतीय सांकेतिक भाषेचा अर्थ पिक्चर-इन-पिक्चर पद्धतीने मांडणे आवश्यक आहे आणि सोबतच ते अचूक, सिंक्रोनाइझ केलेले असणे आवश्यक आहे तसेच त्याद्वारे श्रवण दोष असणाऱ्या व्यक्तींना स्पष्ट संदेश पोहोचणे आवश्यक आहे.
- चित्रपट निर्मात्याने सुलभता वैशिष्ट्यांच्या फाइल्ससह प्रमाणपत्र मिळविण्यासाठी चित्रपट सीबीएफसी अर्थात केंद्रीय चित्रपट प्रमाणन बोर्डाकडे पाठवणे आवश्यक आहे.
- अंमलबजावणीचे वेळापत्रक:
- एकापेक्षा जास्त भाषांमध्ये प्रमाणित केलेल्या सर्व चित्रपटांनी 6 महिन्यांच्या आत आणि इतर सर्व चित्रपटांनी 2 वर्षांच्या आत मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक.
- 1 जानेवारी, 2025 पासून, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासारख्या प्रतिष्ठित कार्यक्रमांसाठी सबमिट केलेल्या चित्रपटांना देखील नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
- चित्रपटागृहाद्वारे सुलभता वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणत्याही मार्गाने उपयोजित केली जाऊ शकतात:
- चित्रपटगृहांमध्ये (नियमित शो दरम्यान) पुढील स्वतंत्र उपकरणे वापरणे, जसे की, मिरर कॅप्शन, क्लोज्ड कॅप्शनिंग स्मार्ट ग्लासेस, क्लोज्ड कॅप्शन स्टँड, स्क्रीनच्या खाली क्लोज्ड डिस्प्ले किंवा ऑडिओ वर्णन (AD) साठी हेडफोन/इयरफोन इ.
- मोबाईल ॲप्स वापरणे (नियमित शो दरम्यान) - चित्रपट निर्माते चित्रपटगृहात चित्रपटाच्या नेहमीच्या स्क्रीनिंगमध्ये सुलभता वैशिष्ट्य विस्तारित करण्यासाठी, क्लोज्ड कॅप्शनिंग/ओसी आणि ऑडिओ डिसक्रीप्शन समाकलित करण्यासाठी कोणतेही योग्य सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन वापरू शकतात, जेणेकरून वापरकर्त्याच्या वैयक्तिक डिव्हाइसवर देखील ही सुविधा उपलब्ध होईल.
- इतर तंत्रज्ञानाचा वापर : इतर कोणत्याही तांत्रिक इनपुटचा वापर सहाय्यक किंवा सहायक उपकरणे आणि बाजारात उपलब्ध सॉफ्टवेअर ऍप्लिकेशनचा वापर.
महत्वाच्या लिंक्स:
* * *
PIB IFFI CAST AND CREW | G.Chippalkatti/Sanjana/Shraddha/Darshana | IFFI 55
(Release ID: 2077986)
अभ्यागत कक्ष : 69