महिला आणि बालविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

‘नवी चेतना - नयी चेतना ३.०’ मोहिमेद्वारे सुरू होणारी मोहीम लिंग आधारित हिंसा समाप्त करण्यासाठी कृती करण्याचे आवाहन करण्याचा व्यापक प्रसार सुनिश्चित करेल


#अब कोई बहाना नही – आता कोणता बहाना नाही - ही मोहीम महिला आणि बालविकास मंत्रालय आणि ग्रामीण विकास मंत्रालय यांच्या संयुक्त प्रयत्नांचा उपक्रम असून संयुक्त राष्ट्र महिला ‘यूएन वुमन’ – यांच्या सहकार्याने ही मोहीम राबवली जात आहे.

प्रविष्टि तिथि: 24 NOV 2024 12:47PM by PIB Mumbai

 

महिला व बालविकास मंत्री श्रीमती अन्नपूर्णा देवी, उद्या, २५ नोव्हेंबर २०२४ रोजी, नवी दिल्ली येथील आकाशवाणीच्या रंग भवन येथे “#अब कोई बहाना नही” या राष्ट्रीय मोहिमेचे उद्घाटन करतील. या प्रसंगी ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान, आणि ग्रामीण विकास व दळणवळण राज्यमंत्री  डॉ. चंद्रशेखर पेम्मसानी हे उपस्थित राहणार आहेत.

ही मोहीम सर्वसामान्य, सरकार आणि महत्त्वाचे भागधारक यांना लिंग आधारित हिंसा समाप्त करण्यासाठी कृतीशील पावले उचलण्याचे आवाहन करते. महिला व बालविकास मंत्रालय आणि ग्रामीण विकास मंत्रालय यांच्या संयुक्त सहकार्याने ही मोहीम सुरू आहे. ‘नयी चेतना 3.0’ मोहिमेसोबत ही मोहीम सुरू झाली आहे. लिंग आधारित हिंसेच्या विरोधात कृतीचे आवाहन व्यापक पातळीवर पोहोचवण्यासाठी विशेषतः ग्रामीण भागांत ही मोहीम राबवली जाणार असून या संदेशाला सर्वांपर्यंत पोहोचवले जाणार आहे.

जागतिक स्तरावर २५ नोव्हेंबर (महिलांविरुद्ध हिंसा समाप्तीचा आंतरराष्ट्रीय दिवस) पासून दहा डिसेंबर (मानवाधिकार दिन) पर्यंत दरवर्षी '१६ दिवसांची सक्रियता मोहीम' साजरी केली जाते, जी लिंग आधारित हिंसा समाप्त करण्याविषयी जनजागृती करण्यासाठी आहे.

भारत सरकारने या वर्षी  संयुक्त राष्ट्रांच्या #बहाना चालणार नाही - 'नो एक्स्क्यूज ' या मोहिमेवर आधारित #अब कोई बहाना नही या मोहिमेची सुरुवात केली आहे. यामध्ये महिलांवर होणाऱ्या हिंसेच्या गंभीर समस्येकडे लक्ष वेधून घेत प्रतिबद्धता पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि जबाबदारी व कृती सुनिश्चित करण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच, या मोहिमेतून स्त्रिया व मुलींविरुद्ध हिंसा समाप्त करण्याची तातडीची गरज अधोरेखित केली जाईल आणि कोणत्याही स्वरूपाच्या लिंग आधारित हिंसेसाठी शून्य-सहनशीलतेची राष्ट्रीय भूमिका स्पष्ट केली जाईल.

या मोहिमेमध्ये #अब कोई बहाना नही या विषयावर आधारित एक चित्रपट प्रदर्शित केला जाईल. यात प्रत्येक नागरिक आणि सर्व संबंधितांची या संदर्भातील जबाबदारी अधोरेखित करण्यात आली असून याद्वारे लिंग आधारित हिंसा समाप्त करण्यासाठी शपथ घेण्याचे आवाहन करण्यात येईल.

***

S.Pophale/N.Gaikwad/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2076611) आगंतुक पटल : 127
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Punjabi , English , Urdu , हिन्दी , Tamil