अर्थ मंत्रालय
महसूल गुप्तचर संचालनालयाने मुंबई विमानतळावर केलेल्या कारवाईत 3496 ग्रॅम कोकेनसह एका संशयिताला केली अटक
Posted On:
23 NOV 2024 10:27AM by PIB Mumbai
महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) 22 नोव्हेंबर 2024 रोजी मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या कारवाईत सिएरा लिओन येथून आलेल्या एका लायबेरियन नागरिकाला ताब्यात घेतले. या प्रवाशाच्या ट्रॉली बॅगचे वजन असामान्यपणे अधिक असल्याचे आढळून आल्यामुळे डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी कसून तपासणी केली. त्यामध्ये ट्रॉली बॅगच्या तळाशी चोर कप्प्यात पांढरी भुकटी असलेली दोन पाकिटे सापडली. प्रयोगशाळेतील तपासणी मध्ये ते कोकेन असल्याचे स्पष्ट झाले. त्याचे एकूण वजन 3496 ग्रॅम इतके असून, बेकायदेशीर बाजारात त्याचे मूल्य रु. 34.96 कोटी इतके आहे. संबंधित प्रवाशाला अटक करण्यात आली असून पुढील तपासणी सुरु आहे.
अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळ्या उध्वस्त करण्यासाठी आणि अमली पदार्थांच्या धोक्यापासून नागरिकांचं रक्षण करण्यासाठी डीआरआय वचनबद्ध आहे.
***
S.Patil/R.Agashe/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2076419)
Visitor Counter : 9