माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner
0 4

“सिनेमा हे प्रादेशिक भाषांचे जतन करण्याचे शक्तिशाली साधन आहे:” चंदन सिंग, दिग्दर्शक, ‘रोटी कून बनासी?’


'रोटी कुंण बणासी ?' चित्रपट भारतीय कुटुंबांमधील परंपरा आणि लैंगिक समानता यांच्यातील संघर्ष अधोरेखित करतो

‘ब्रमयुगम’ मानवी मानसिकता आणि सामाजिक पदानुक्रमांचे परीक्षण करण्यासाठी एक अलौकिक दृष्टिकोन प्रदान करते.

‘ब्रमयुगम’ मध्ये अलौकिक शक्तींच्या विषण्ण कथेत जगण्याचा संघर्ष, विश्वासघात, भीती, मिथके आणि अतिमानुष शक्ती यांची गुंफण केली आहे

#IFFIWood, 22 नोव्‍हेंबर 2024

 

55 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) प्रादेशिक संस्कृती आणि मिथके रुजलेल्या वैविध्यपूर्ण कथा सादर करण्याचे एक व्यासपीठ बनले आहे. चंदन सिंग दिग्दर्शित 'रोटी कुंण बणासी?' हे राजस्थानी कुटुंबातील नाट्य आणि राहुल सदाशिवन दिग्दर्शित मल्याळम भयपट  ‘ब्रमयुगम’ यांनी परंपरा, ओळख आणि सामाजिक अपेक्षांचा छेदनबिंदू शोधून वैशिष्ट्यपूर्ण कथानकांच्या माध्यमातून प्रेक्षकांना खिळवून ठेवले  आहे.

'रोटी कुंण बणासी?' पितृसत्तेच्या पिढीजात  प्रभावाचा शोध घेतो. हे  मार्मिक राजस्थानी भाषेतील एक नाट्य  आहे. हा चित्रपट वडिलांच्या पारंपारिक अपेक्षा आणि पत्नीला पाठिंबा देण्याची इच्छा यांच्यात अडकलेल्या एका तरुणाची कथा सांगतो. या सूक्ष्म चित्रणाद्वारे, सिंग यांनी पितृसत्ताक विश्वास कौटुंबिक गतिशीलतेला, विशेषतः स्त्रियांनी सहन केलेल्या असमान ओझ्याला कसा आकार देतो हे उलगडून दाखवले आहे.

सिंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “पितृसत्ता ही पिता-पुत्राच्या नात्याबद्दल आहे आणि शेवटी महिलाच बळी ठरतात. राजस्थानमधील त्यांच्या स्वतःच्या अनुभवांमधून, सिंग यांनी बदलाची हाक देत पारंपारिक कुटुंबांमधील महिलांसाठी  मर्यादित संधींचे वास्तव प्रतिबिंबित करण्याचा प्रयत्न केला आहे.

राजस्थानी भाषेत चित्रित झालेला हा चित्रपट प्रादेशिक भाषा आणि संस्कृतीला मानवंदना  आहे. “सिनेमा हे प्रादेशिक भाषेचे जतन करण्याचे  शक्तिशाली साधन आहे. ‘रोटी कुंण बणासी?'  हा  राजस्थानी भाषेत बनवून , मला आमची भाषा आणि संस्कृती अधिकाधिक  प्रेक्षकांसमोर सादर करायची होती.” यावर सिंग यांनी भर  दिला.

प्रकाशझोतातील आणखी एक चित्रपट ‘ब्रमयुगम’ प्रेक्षकांना 17व्या शतकातील मलबारमध्ये घेऊन जातो, जगण्याचा संघर्ष, विश्वासघात आणि अलौकिक शक्तींच्या या विषण्ण कथेत भीती आणि पौराणिक कथा यांची सांगड घातली आहे.

हा चित्रपट पोर्तुगीज गुलाम व्यापाऱ्यांपासून पळून जाणाऱ्या थेवन  नावाच्या माणसाभोवती फिरतो जो परित्यक्त जागेच्या भयंकर रहस्यांमध्ये अडकतो. त्याच्या मध्यभागी  चथनची झपाटलेली आकृती आहे - वराही देवीने घराच्या पूर्वजांना भेट म्हणून दिलेला हा राक्षस आहे. पिढ्यानपिढ्या, राक्षसाने कहर केला आहे, ज्याची परिणिती सत्ता संघर्षात झाली आहे ज्यामध्ये सामील असलेल्या प्रत्येकाला त्याने गिळले आहे.

ब्रमयुगम हा केवळ एक भयपट नाही तर सत्तेचा  भ्रष्टाचार, मानवी दुर्बलता आणि दडपशाहीचे चक्रीय स्वरूप याविषयी बहुस्तरीय  कथा आहे. कथेचे गॉथिक वातावरण आणि गुंतागुंतीचे कथानक याला  मल्याळम सिनेमातली एक उत्कृष्ट प्रवेशिका  बनवते. चित्रपटाची संकल्पना प्रेक्षकांना आपलीशी वाटणारी असून  वेळ किंवा स्थान याचा विचार न करता, सत्तेची लालसा अनेकदा विनाशकारी परिणामांकडे घेऊन जाते हे दाखवले आहे. .

‘रोटी कुंण बणासी?' आणि ‘ब्रमयुगम’ हे दोन्ही प्रादेशिक चित्रपटांची परिवर्तनीय शक्ती अधोरेखित करतात. ‘रोटी कुंण बणासी?' पितृसत्ताक संरचनेतील लैंगिक समानतेच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधतो तर ब्रमयुगम मानवी मानसिकता आणि सामाजिक पदानुक्रमांचे परीक्षण करण्यासाठी एक अलौकिक दृष्टिकोन देतो. 

चंदन सिंग यांनी प्रादेशिक आवाज पोहचवण्यासाठी इफ्फीसारख्या व्यासपीठाचे महत्त्व नमूद केले. “इफ्फी सारखे महोत्सव माझ्यासारख्या चित्रपटांना व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची संधी देतात. ते आमच्या प्रांतातील  कथांकडे लक्ष वेधण्यात मदत करतात ज्या अन्यथा ऐकल्या जाऊ शकत नाहीत.” त्याचप्रमाणे, ब्रमयुगम लोककथांचे सार्वत्रिक आकर्षण दाखवून देत प्रादेशिक कथा जागतिक प्रेक्षकांना भुरळ घालू शकतात हे सिद्ध करतो.

दोन्ही चित्रपट शैली आणि स्वरूपाच्या बाबतीत खूप भिन्न असले तरी, अर्थपूर्ण संभाषणे सुरू करण्याची वचनबद्धता सामायिक करतात. एकत्रितपणे, हे चित्रपट भारतीय सिनेमाच्या विकसित होत असलेल्या परिदृश्याचे उदाहरण सादर करतात, जिथे प्रादेशिक कथांना त्यांचा गाभा , कलात्मकता आणि सांस्कृतिक महत्त्व यासाठी ओळखले जात आहे.

पत्रकार परिषदेची लिंक:

 

* * *

PIB IFFI CAST AND CREW | G.Chippalkatti/Sushma/Darshana | IFFI 55

iffi reel

(Release ID: 2076317) Visitor Counter : 8