संरक्षण मंत्रालय
पश्चिम किनारपट्टीलगत एक मच्छिमार बोट भारतीय नौदलाच्या पाणबुडीवर आदळली
शोध आणि बचाव कार्यातून 13 पैकी 11 कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश
उर्वरित दोघांचा शोध सुरु
Posted On:
22 NOV 2024 8:00AM by PIB Mumbai
गोव्याच्या वायव्य किनाऱ्यालगत सुमारे 70 सागरी मैल अंतरावर 21 नोव्हेंबर 2024 रोजी मार्थोमा ही भारतीय मच्छिमार बोट, भारतीय नौदलाच्या पाणबुडीवर आदळली. भारतीय नौदलाच्या 6 बोटी आणि विमानाच्या मदतीने अपघातस्थळी लगेचच शोध आणि बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली असून मच्छिमार बोटीवरील 13 कर्मचाऱ्यांपैकी 11 जणांना वाचवण्यात आतापर्यंत यश आले आहे.
***
JPS/SC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2075908)
Visitor Counter : 32