संरक्षण मंत्रालय
दुसरी भारत-जपान संयुक्त सेवा कर्मचारी चर्चा नवी दिल्लीमध्ये संपन्न
Posted On:
20 NOV 2024 8:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2024
एकात्मिक संरक्षण कर्मचारी (एचक्यू आयडीएस) आणि जपान स्वसंरक्षण दल (जेएसडीएफ) या मुख्यालयांच्या संयुक्त कर्मचार्यांमध्ये 2री भारत-जपान संयुक्त सेवा कर्मचारी चर्चा (जेएसएसटी) 20 नोव्हेंबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे संपन्न झाली. आधुनिक युद्धशास्त्राच्या बदलत्या प्रवाहाची ओळख म्हणून, दोन्ही देशांनी त्यांच्या संरक्षण भागीदारीतील महत्त्वाचे घटक म्हणून अंतराळ आणि सायबर तंत्रज्ञानामध्ये सहकार्य मजबूत करण्यासाठी एकत्रित बांधिलकी दर्शवली.
या बैठकीचे सह-अध्यक्षस्थान आयडीएसचे सहाय्यक प्रमुख एअर व्हाइस मार्शल प्रशांत मोहन आणि जेएसडीएफ संयुक्त कर्मचारी, संरक्षण योजना व धोरण विभाग (जे5) चे महासंचालक मेजर जनरल मिनामिकावा नोबुटाका यांनी केले. यावेळी दोन्ही देशांतील संरक्षण सहकार्य मजबूत करण्यासाठी व विद्यमान द्विपक्षीय संरक्षण यंत्रणांअंतर्गत नवीन सहकार्याच्या संधी शोधण्यासाठी फलदायी चर्चासत्रे झाली. उदयोन्मुख सुरक्षा आव्हाने हाताळण्यासाठी, सामायिक हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी आणि इंडो-पॅसिफिक प्रदेशातील शांतता टिकवण्यासाठी भारत आणि जपान भागीदारीचे वाढते महत्त्व दोन्ही देशांनी मान्य केले.
जेएसएसटी हा भारत आणि जपान दरम्यान नियमित आणि उच्चस्तरीय कार्यात्मक चर्चेद्वारे संरक्षण सहकार्य पुढे नेण्यासाठीचा एक मंच आहे. या बैठका दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांमध्ये जवळीकता आणण्यासाठी आणि व्यावसायिक सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठीचा एक महत्त्वाचा मंच ठरतो. जेएसएसटी ने यशस्वीरित्या द्विपक्षीय संरक्षण संबंध मजबूत केले. तसेच प्रगतीवर आधारित कार्य पुढे नेण्याची आणि भविष्यात नियमित चर्चेसाठी एकत्र येण्याची प्रतिज्ञा केली. ही बांधिलकी परस्पर विश्वास, सन्मान आणि सामायिक मूल्यांवर आधारित असलेल्या दोन्ही देशांमधील दीर्घकालीन रणनीतिक भागीदारी दर्शविते.
S.Patil/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2075241)
Visitor Counter : 15