श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सप्टेंबर 2024 मध्ये 20.58 लाख नवे कामगार ईएसआय योजनेत झाले दाखल

Posted On: 19 NOV 2024 7:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 नोव्‍हेंबर 2024

 

सप्टेंबर 2024 मध्ये 20.58 लाख नवीन कर्मचारी जोडले गेल्याचे ईएसआयसी,कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या  तात्पुरत्या वेतनश्रेणी डेटावरून दिसून आले आहे.

सप्टेंबर 2024 मध्ये 23,043 नवीन आस्थापना ईएसआय योजनेच्या सामाजिक सुरक्षा कक्षेत आणल्या गेल्या आहेत, ज्यामुळे अधिक कामगारांना सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करता येणार आहे. 

सप्टेंबर 2023 च्या तुलनेत निव्वळ नोंदणीमध्ये 9% ची वाढ झाल्याचे वार्षिक विश्लेषणावरून दिसून येत आहे.

Year on Year Comparison

Head

September 2023

September 2024

Growth

Number of New employees registered during the month

18.88 Lakh

20.58 Lakh

1.70 Lakh

या महिन्यादरम्यान जोडलेल्या एकूण 20.58 लाख कर्मचाऱ्यांपैकी 10.05 लाख कर्मचारी  अर्थात  48.83% कर्मचारी हे 25 वर्षे वयोगटातील आहेत हे डेटा वरुन  लक्षात येते.

तसेच, वेतनश्रेणी डेटाचे लिंगनिहाय विश्लेषण दर्शविते की सप्टेंबर, 2024 मध्ये महिला सदस्यांची निव्वळ नोंदणी 3.91 लाख होती. याशिवाय, एकूण 64 ट्रान्सजेंडर कर्मचाऱ्यांनी सप्टेंबर 2024 मध्ये ईएसआय योजनेअंतर्गत नोंदणी केली असून यातून . समाजातील प्रत्येक घटकापर्यंत ईएसआयसीचा लाभ पोहोचवण्याची  वचनबद्धता  प्रतीत होते.

डेटा निर्मिती हे एक निरंतर कार्य असल्याने वेतनपट डेटा तात्पुरता आहे.

 

* * *

N.Chitale/H.Kulkarni/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2074748) Visitor Counter : 20


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil