भारतीय स्पर्धा आयोग
azadi ka amrit mahotsav

सीसीआयने गोपनीयता धोरण अद्यतन संदर्भात अनुचित पद्धतींचा अवलंब केल्याबद्दल मेटा ला 213.14 कोटी रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला

Posted On: 18 NOV 2024 11:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 नोव्‍हेंबर 2024

 

भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) आज मेटाला बाजार वर्चस्वाचा गैरवापर केल्याबद्दल 213.14 कोटी रुपयांचा दंड ठोठावला. व्हॉट्सॲपचे 2021 मधील अद्ययावत गोपनीयता धोरण कसे लागू केले गेले आणि वापरकर्त्याचा डेटा कसा संकलित केला गेला आणि मेटाच्या इतर कंपन्यांना ज्या तऱ्हेने पुरविला गेला याच्याशी संबंधित हे प्रकरण आहे. स्पर्धेला मारक पद्धती थांबवण्याचे आणि अशा कुप्रथांपासून दूर राहण्याचे कठोर निर्देश आयोगाने मेटाला दिले असून मेटा आणि व्हॉट्सॲपला देखील त्यांच्या वर्तणुकीशी संबंधित विशिष्ट उपाय नियत वेळेत लागू करण्यास सांगितले आहे.

या प्रकरणात, आयोगाने दोन संबंधित बाजारपेठांचे, एक भारतात स्मार्टफोनद्वारे ओटीटी मेसेजिंग ॲप्सची बाजारपेठ; आणि दुसरी भारतातील ऑनलाइन डिस्प्ले जाहिरातींची बाजारपेठ,  वर्णन केले आहे. त्याचबरोबर भारतात स्मार्टफोनद्वारे ओटीटी मेसेजिंग ॲप्सच्या बाजारपेठेत व्हॉट्सॲपच्या माध्यमातून कार्यरत मेटा ग्रुपचे वर्चस्व असल्याचे दिसून आले आहे. शिवाय, असे देखील आढळून आले की भारतातील ऑनलाइन डिस्प्ले जाहिरातींमध्ये प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत मेटा आघाडीवर आहे.

जानेवारी 2021 पासून, व्हॉट्सॲपने वापरकर्त्यांना त्याच्या सेवा अटी आणि गोपनीयता धोरणांच्या अद्यतनांबद्दल सूचित केले होते. ॲपमधील अधिसूचनेत असे नमूद करण्यात आले आहे की, 8.02.2021 पासून, व्हॉट्सॲप वापरणे सुरू ठेवण्यासाठी वापरकर्त्यांना या अटी स्वीकारणे आवश्यक होते, ज्यात डेटा संकलनाची विस्तृत व्याप्ती तसेच मेटा कंपन्यांबरोबर अनिवार्य डेटा शेअरिंगचा समावेश आहे.  25.08.2016 च्या गोपनीयता धोरणांतर्गत, व्हॉट्सॲप वापरकर्त्यांना त्यांचा डेटा फेसबुक सोबत सामायिक  करायचा आहे की नाही हे ठरवण्याचा पर्याय देण्यात आला होता. मात्र , 2021 मधील नवीन धोरण अंतर्गत  व्हॉट्सॲपने सर्व वापरकर्त्यांसाठी मेटासह डेटा सामायिकरण अनिवार्य केले आणि  निवड रद्द करण्याचा पूर्वीचा पर्याय काढून टाकला. परिणामी, हा प्लॅटफॉर्म वापरणे सुरू ठेवण्यासाठी वापरकर्त्यांना नवीन अटी स्वीकाराव्या लागल्या, ज्यात मेटासह डेटा सामायिकरण समाविष्ट आहे.

आयोगाने असा निष्कर्ष काढला आहे की व्हॉट्सॲपने 'टेक-इट-ऑर-लीव-इट'' तत्त्वावर 2021 च्या नव्या धोरणात  अनुचित अट लादली आहे कारण ती सर्व वापरकर्त्यांना विस्तारित डेटा संकलन अटी आणि मेटा ग्रुपमध्ये कोणतीही निवड न करता डेटा शेअरिंग स्वीकारण्यास भाग पाडते.  नेटवर्क प्रभाव आणि प्रभावी पर्यायांचा अभाव लक्षात घेत , 2021 मधील अद्ययावत गोपनीयता धोरण वापरकर्त्यांना त्यांचे पालन करण्यास भाग पाडते, त्यांची स्वायत्तता कमी करते आणि मेटा च्या वर्चस्वाचा  गैरवापर करते. त्यानुसार, आयोगाला आढळून आले की मेटा (व्हॉट्सॲप द्वारे) ने कायद्याच्या कलम 4(2)(a)(i) चे उल्लंघन केले आहे.

याशिवाय, मेटा कंपन्यांमध्ये डेटाच्या सामायिकरणाच्या संदर्भात, आयोगाने निष्कर्ष काढला आहे की (अ) व्हाट्सॲप सेवा पुरवण्या व्यतिरिक्त इतर हेतूसाठी मेटा कंपन्यांमध्ये व्हाट्सॲप वापरकर्त्यांचा डेटा सामायिक केल्याने मेटाच्या प्रतिस्पर्ध्यांसाठी या सेवा प्रदान करण्याच्या क्षेत्रात प्रवेशासाठी अडथळा निर्माण होतो, यामुळे कायद्याच्या कलम 4(2)(c) च्या तरतुदींचे उल्लंघन करून, डिस्प्ले जाहिरात बाजारात त्यांना प्रवेश नाकारला जातो. आणि (b) मेटा कंपनी, ऑनलाइन डिस्प्ले जाहिरात मार्केटमध्ये आपले स्थान सुरक्षित राखण्यासाठी, स्मार्टफोनद्वारे ओटीटी मेसेजिंग ॲप्समध्ये आपले वर्चस्व राखण्यात गुंतलेली आहे, जे कायद्याच्या कलम 4(2)(e) चे उल्लंघन आहे.

या आदेशात स्पष्ट केलेल्या स्पर्धा-विरोधी हानी लक्षात घेता आणि अशा हानीचे निराकरण करण्याच्या उद्देशाने, ओपींना पुढील निर्देशांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत:

  1. हा आदेश प्राप्त झाल्यापासून 5 (पाच) वर्षांच्या कालावधीसाठी व्हॉट्सॲप त्याच्या व्यासपीठावरुन संकलित केलेला वापरकर्त्यांचा डेटा जाहिरात करण्याच्या उद्देशाने इतर मेटा कंपन्या किंवा मेटा कंपनी उत्पादनाबरोबर सामायिक करू शकणार नाही. उक्त कालावधी संपल्यानंतर, जाहिरातींच्या उद्देशाने डेटाच्या अशा सामायिकरणाच्या संदर्भात आवश्यक बदलांसह परिच्छेद 6.2 मधील निर्देश (परिच्छेद 6.2.1 वगळता) लागू होतील.
  2. जाहिरातीव्यतिरिक्त इतर हेतूंसाठी व्हॉट्सॲप वापरकर्त्यांचा डेटा शेअर करण्याच्या संदर्भात:
    1. व्हॉट्सॲप च्या धोरणामध्ये इतर मेटा कंपन्या किंवा मेटा कंपनी उत्पादनाबरोबर सामायिक केलेल्या वापरकर्त्याच्या डेटाचे तपशीलवार स्पष्टीकरण समाविष्ट केले पाहिजे. या स्पष्टीकरणात डेटा सामायिक करण्याचा उद्देश निर्दिष्ट केला पाहिजे तसेच प्रत्येक प्रकारच्या डेटाला त्याच्या संबंधित उद्देशाशी जोडणे देखील आवश्यक आहे.
    2. वाटरकर्त्यांना भारतात व्हॉट्सॲप सेवा मिळवण्यासाठी, व्हॉट्सॲप वर संकलित केलेला वापरकर्त्यांचा डेटा, व्हॉट्सॲप सेवा प्रदान करण्याव्यतिरिक्त इतर कारणांसाठी मेटा कंपन्या किंवा मेटा कंपनी उत्पादनांबरोबर सामायिक करणे आवश्यक, अशी अट घालता येणार नाही.
    3. व्हॉट्सॲप सेवा प्रदान करण्याव्यतिरिक्त इतर हेतूंसाठी व्हॉट्सॲप वापरकर्त्यांचा डेटा सामायिक करण्याच्या संदर्भात, भारतातील सर्व वापरकर्त्यांना (ज्यांनी 2021 अपडेट स्वीकारला आहे अशा वापरकर्त्यांसह) पुढील गोष्टी प्रदान केल्या जातील:
      1. ॲप-मधील अधिसूचनेद्वारे ठळकपणे निवड रद्द करण्याच्या पर्यायाद्वारे असे डेटा सामायिकरण व्यवस्थापित करण्याची निवड;  आणि
      2. व्हॉट्सॲप ऍप्लिकेशनच्या सेटिंग्जमधील प्रमुख टॅबद्वारे डेटाच्या अशा सामायिकरणाच्या संदर्भात त्यांच्या निवडीचे पुनरावलोकन आणि बदल करण्याचा पर्याय.
      3. भविष्यातील सर्व धोरण अद्यतने देखील या आवश्यकतांचे पालन करतील.

या आदेशाची सार्वजनिक आवृत्ती लवकरच आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड केली जाईल.

 

* * *

JPS/Sushma/Shraddha/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2074566) Visitor Counter : 6


Read this release in: English , Urdu , Hindi