पंतप्रधान कार्यालय
झाशी वैद्यकीय महाविद्यालयात आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले
पंतप्रधानांनी पीएमएनआरएफमधून सानुग्रह मदतीची केली घोषणा
प्रविष्टि तिथि:
16 NOV 2024 8:23AM by PIB Mumbai
नवी दिल्ली 16 नोव्हेंबर 2024
उत्तर प्रदेशात झाशी वैद्यकीय महाविद्यालयात आगीच्या दुर्घटनेमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.राज्य सरकारच्या देखरेखीखाली, स्थानिक प्रशासन या घटनेतील पीडितांना सर्व प्रकारची मदत करत आहे अशी ग्वाही त्यांनी दिली.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात:
“अत्यंत हृदयविदारक घटना! उत्तर प्रदेशात झाशी येथील वैद्यकीय महाविद्यालयात आग लागून झालेली दुर्घटना मन व्यथित करणारी आहे. या दुर्घटनेत ज्यांनी स्वतःची निरागस मुले गमावली, त्यांच्या प्रती मी तीव्र दुःख व्यक्त करतो. त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. राज्य सरकारच्या देखरेखीखाली, स्थानिक प्रशासन या घटनेतील पीडितांना दिलासा देऊन बचाव कार्यात हर प्रकारे मदत करत आहे: पंतप्रधान @narendramodi"
झाशी वैद्यकीय महाविद्यालयातील आगीच्या दुर्घटनेत जीव गमावलेल्या प्रत्येकाच्या जवळच्या नातेवाईकाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (पीएमएनआरएफ) 2 लाख रुपयांची सानुग्रह मदत देण्याची घोषणा देखील पंतप्रधान मोदी यांनी केली. या घटनेतील जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये देण्यात येतील असे देखील त्यांनी सांगितले.
एक्स मंचावर पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) पाठवलेल्या संदेशात म्हटले आहे:
“पंतप्रधान @narendramodi यांनी झाशी वैद्यकीय महाविद्यालयातील आगीच्या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकाला पीएमएनआरएफमधून 2 लाख रुपयांची सानुग्रह मदत देण्याची घोषणा केली आहे. आगीत जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत दिली जाईल”
***
S.Tupe/S.Chitnis/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2073814)
आगंतुक पटल : 64
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam