संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वार्षिक नौदल विमान उड्डाण सुरक्षा बैठक(एनएफएसएम) आणि उड्डाण सुरक्षा चर्चासत्र(एफएसएस)- 2024

Posted On: 14 NOV 2024 5:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर 2024

विशाखापट्टणममध्ये आयएनएस डेगा येथे 12-13 नोव्हेंबर रोजी, इस्टर्न नेव्हल कमांडच्या मुख्यालयाच्या नेतृत्वाखाली  हवाई उड्डाण सुरक्षा चर्चासत्र आणि वार्षिक नौदल विमान उड्डाण सुरक्षा बैठकीचे आयोजन करण्यात आले. 12 नोव्हेंबरला हवाई उड्डाण सुरक्षा चर्चासत्राची सुरुवात झाली. यावेळी इस्टर्न नेव्हल कमांडच्या मुख्यालयाचे प्रमुख ध्वजअधिकारी वाईस ऍडमिरल राजेश पेंढारकर यांनी प्रमुख अतिथी म्हणून बीजभाषण केले. 

‘नव्याने उदयाला येत असलेले धोके आणि आव्हाने- नौदलाच्या हवाई कारवाया आणि हवाई सुरक्षा अनुपालन’ या विषयावर केंद्रित असलेल्या या चर्चासत्रात यूएव्ही/यूएएस प्रतिबंधक तंत्रज्ञानातील प्रगती आणि डावपेच,हवाई परिचालनात सायबर सुरक्षा जोखमी आणि विमान प्रणालींसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना यांसह समकालीन विषयांवर भर देण्यात आला.हवाई मोहिमांदरम्यान,मानसिक कणखरतेसाठी मानसिक परिपूर्णता प्रशिक्षणाच्या महत्त्वावर देखील विचारमंथन करण्यात आले.परिचालन प्रक्रियेत उदयाला येत असलेल्या जोखमींच्या व्यवस्थापनासाठी सर्वसमावेशक दृष्टीकोनाचा अवलंब करण्याला या चर्चेत प्रोत्साहन देण्यात आले तसेच हवाई क्षेत्रातील महत्त्वाच्या मालमत्ता आणि साधनसामग्रींच्या संरक्षणासाठी विविध संरक्षण दलांदरम्यान सामाईक दक्षतेच्या आवश्यकतेवर भर देण्यात आला. या कार्यक्रमाला भारतीय लष्कर, हवाई दल, तटरक्षक दल आणि हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड सारख्या महत्त्वाच्या संरक्षण संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

13 नोव्हेंबर रोजी एनएफएसएम मध्ये भारतीय नौदलातील प्रमुख हितधारकांना आणण्यात आले. नौदल उपप्रमुख(हवाई) रिअर ऍडमिरल झनक बेव्हील यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले. नौदलाच्या सर्व हवाई मोहिमांमध्ये सुरक्षित उड्डाण सुनिश्चित करण्यासाठी या चर्चासत्रात सुरक्षाविषयक पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला. यामध्ये पक्षी आणि प्राण्यांमुळे हवाई उड्डाणात निर्माण होणारे अडथळे दूर करण्यासाठी आधुनिक उपाययोजनांवर देखील चर्चा करण्यात आली. 

दोन्ही दिवस पॅनल चर्चा आणि तज्ञांकडून सादरीकरणे यांचा समावेश असलेल्या सत्रांचे आयोजन झाले. नौदलाच्या हवाई परिचालनात सर्वोच्च सुरक्षा मानके सुनिश्चित करण्याची आणि हवाई उड्डाण सुरक्षा नियमांमध्ये वाढ करण्याबाबतची भारतीय  नौदलाची वचनबद्धता या चर्चासत्रातून अधोरेखित झाली.

 

S.Tupe/S.Patil/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2073321) Visitor Counter : 9