संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय नौदल प्रश्नमंजुषा - थिंक 2024 ची आयएनए  येथे एका शानदार अंतिम फेरीसह सांगता


जयश्री पेरीवाल हायस्कूल, जयपूर ने  थिंक 2024 चे पटकावले विजेतेपद

तुमच्या क्षितिजाच्या पलीकडे जा

प्रविष्टि तिथि: 09 NOV 2024 11:03AM by PIB Mumbai

 

भारतीय नौदलाने भारताची  प्रगती आणि 'विकसित  भारतसंकल्पनेचा उत्सव असलेल्या  थिंक 2024 (THINQ 2024) प्रश्नमंजुषेचे  8 नोव्हेंबर 24 रोजी  अभिमानास्पद आयोजन केले. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी एक आदर्श ठिकाण  आणि भारताचा सागरी वारसा आणि उत्कृष्टतेप्रति समर्पणाचे प्रतीक असलेल्या एळीमाला स्थित भारतीय नौदल अकादमीच्या नयनरम्य नालंदा ब्लॉक येथे या स्पर्धेची भव्य अंतिम फेरी पार पडली.  शाळकरी मुले, नौदल कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय, निवृत्त नौदल अधिकारी , मान्यवर अतिथी  आणि आयएनए चे प्रशिक्षणार्थी यांचा समावेश असलेल्या उत्साही प्रेक्षकांसमोर ही अटीतटीची अंतिम फेरी पार पडली.  ही बौद्धिक लढाई होती ज्यात सहभागी झालेल्या  स्पर्धकांच्या ज्ञानाचा कस लागला आणि प्रेक्षकांनाही खिळवून ठेवले.

थिंक 2024 साठी झालेल्या अटीतटीच्या स्पर्धेनंतर जयपूरचे जयश्री पेरीवाल हायस्कूल  विजेते ठरले  तर चेन्नईचे बी व्ही भवनचे विद्याश्रम उपविजेते ठरले. नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी आणि नेव्ही वेलफेअर अँड वेलनेस असोसिएशनच्या अध्यक्ष शशी त्रिपाठी यांच्या हस्ते या उल्लेखनीय कार्यक्रमाच्या यशात योगदान देणाऱ्या विजेते, सहभागी स्पर्धक आणि शाळांना गौरवण्यात आले.

थिंक 2024 ने बौद्धिक आदानप्रदान आणि स्पर्धेसाठी राष्ट्रीय मंच उपलब्ध करून भारतातील तल्लख युवा  मनांची अपवादात्मक प्रतिभा प्रदर्शित केली आहे . थिंक ही केवळ प्रश्नमंजुषा नाही तर ही स्पर्धा युवकांचा  प्रवास  आणि विकसित भारत’ प्रति भारतीय नौदलाच्या  योगदानाचा दाखला आहे. विकासाच्या दिशेने भारताचा प्रवास सुरू असून  स्पर्धात्मक भावना जोपासत आणि नौदलाच्या जीवनपद्धतीला प्रेरित करत  थिंक 2024 (THINQ 2024 )  सारखे उपक्रम युवा मनाला आकार देण्यात  महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.

***

M.Chopade/S.Kane/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2071955) आगंतुक पटल : 104
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil , Telugu