नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या वार्षिक संमेलनाचे सातवे सत्र 103 सदस्य व 17 स्वाक्षरीकर्ता देशाच्या उपस्थितीत आयोजित

Posted On: 04 NOV 2024 7:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर 2024


आंतरराष्ट्रीय सौर आघाडी  त्यांच्या संमेलनाचे सातवे सत्र 29 देशांतील मंत्र्यांच्या उपस्थितीत भारताच्या राजधानीत आयोजित करत आहे. सत्राचे उदघाटन करताना भारताचे नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्री व आंतरराष्ट्रीय सौर आघाडी संमेलनाचे अध्यक्ष प्रल्हाद जोशी म्हणाले, “आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या संमेलनाच्या सातव्या सत्रात आपणा सर्वांना संबोधित करण्याची संधी मिळणे हा मी माझा सन्मान समजतो. जागतिक स्तरावर ऊर्जावापराचे भवितव्य ठरवण्याच्या मोहिमेत आज आपण एका महत्वाच्या वळणावर येऊन ठेपलो आहोत.एके काळी फक्त कल्पना असलेली  सौरऊर्जा आज प्रत्यक्षात अस्तित्वात आली आहे,जगाला शाश्वत व स्वच्छ ऊर्जावापराच्या मार्गावर नेऊ पाहत आहे.आपण आतापर्यंत केलेली प्रगती कोणी नाकारू शकत नाही, सौरऊर्जेची संपूर्ण क्षमता हळूहळू विकसित होत आहे आणि त्यामुळे ऊर्जाक्षेत्रात आमूलाग्र बदल होत असलेला दिसत आहे.” ते पुढे म्हणाले, “120 सदस्य व स्वाक्षरीकर्ता  देशांची आघाडी म्हणून आंतरराष्ट्रीय सौर आघाडी जगभरात,विशेषतः कमी विकसित देशांमध्ये व विकसनशील लघु द्वीप देशांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प सुरु करण्यासाठी आणि निधीची जुळवाजुळव करण्यात अग्रस्थानी आहे.”

मला हे सांगताना अभिमान वाटतो की आंतरराष्ट्रीय सौर आघाडीने 27 पैकी 21 प्रात्यक्षिक प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. यातून सौरऊर्जेच्या उपयोजनामध्ये महत्त्वपूर्ण प्रगती करण्याची आणि जगभरातील शाश्वत विकासाला समर्थन देण्याची आमची सामूहिक क्षमता प्रदर्शित होते.हे यशस्वी प्रकल्प आमच्या सामायिक वचनबद्धतेचा आणि समर्पणाचा दाखला  आहेत. मी अकरा प्रात्यक्षिक प्रकल्प आणि आज सुरू केलेल्या सात तारांकित-केंद्रांचे अभिनंदन करतो आणि या देशांच्या  जनतेला समर्पित करतो.”

याव्यतिरिक्त,सोलर एक्स स्टार्टअप चॅलेंजने सौर क्षेत्रासाठी नवोन्मेषी, प्रमाणीकरण करण्याजोगे पर्याय  यशस्वीरित्या निर्धारित आणि समर्थित केले.2024 च्या आवृत्तीत भारतासह आशिया आणि प्रशांत महासागर प्रदेशातील 30 विजेत्यांची घोषणा करण्यात आली.  तसेच लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन बेटे क्षेत्रासाठी चॅलेंजची तिसरी आवृत्ती आयोजित करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जा आघाडी संमेलनाचे सह-अध्यक्ष आणि  फ्रान्सचे विकास आणि आंतरराष्ट्रीय भागीदारी राज्यमंत्री थानी मोहम्मद सोइलीही यांनी  व्हिडिओ द्वारे पाठवलेल्या संदेशात सांगितले:

“आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या सचिवालयाने संस्थेच्या विकासासाठी आणि वर्षानुवर्षे महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आखण्यासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल मी त्यांचे आभार मानू इच्छितो.आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या प्रारंभी, संस्थेच्या सदस्य देशांमधील सौर प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी 1.5 अब्ज युरो € योगदान देण्याचा निर्णय  फ्रान्सने घेतला आहे. या वर्षी देखील,हे संमेलन काही मोठे उपक्रम आणि कार्यक्रम विचारात घेऊन भविष्याची पायाभरणी करणार आहे.”

 

S.Kane/U.Raikar/S.Mukhedkar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


 

 

 




(Release ID: 2070695) Visitor Counter : 26