पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषा गौरव सप्ताहाच्या दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
03 NOV 2024 5:49PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसामच्या जनतेला भाषा गौरव सप्ताहाच्या शुभेच्छा दिल्या आणि #BhashaGauravSaptah चे महत्त्व अधोरेखित केले. X या समाज माध्यमावरील वरील एका पोस्टमध्ये, त्यांनी अलीकडेच या प्रदेशाच्या समृद्ध भाषिक आणि सांस्कृतिक वारशाची एक महत्त्वाची ओळख असणाऱ्या आसामी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याच्या घोषणेबद्दल आनंद व्यक्त केला.
आसामच्या समृद्ध भाषिक वारशाचा आठवडाभर चालणारा ‘भाषा गौरव सप्ताह’ सुरू झाल्याची घोषणा करणाऱ्या आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या संदेशावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधानांनी आज ट्विट केले:
"#भाषागौरवसप्ताह हा एक उल्लेखनीय प्रयत्न आहे. हा उत्सव आसामी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल लोकांना झालेला आनंद अधोरेखित करतो. सर्वांना माझ्या शुभेच्छा. आठवडाभर चालणाऱ्या या कार्यक्रमात लोक आणि आसामी संस्कृती यांच्यातील संबंध अधिक दृढ होतील. आसामबाहेर राहणाऱ्या आसामी लोकांनाही या सप्ताहात सहभागी व्हावे असे आवाहन करतो.”
***
S.Patil/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2070474)
आगंतुक पटल : 102
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam