संरक्षण मंत्रालय
वायुसेना उपप्रमुख एअर मार्शल अजय कुमार अरोरा यांनी भारतीय वायुसेनेच्या देखभाल विभागाचा कार्यभार स्वीकारला
Posted On:
01 NOV 2024 7:47PM by PIB Mumbai
एअर मार्शल अजय कुमार अरोरा यांनी आज भारतीय वायुसेनेच्या मुख्यालयात (वायु भवन) वायुसेना उपप्रमुख (देखभाल) या पदाचा कार्यभार स्वीकारला. कार्यभार स्वीकारल्यानंतर, एअर मार्शल अरोरा यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या सशस्त्र दलाच्या जवानांना आदरांजली वाहिली.
एअर मार्शल अरोरा यांना ऑगस्ट 1986 मध्ये वायुसेनेच्या एरोनॉटिकल इंजिनिअरिंग शाखेत नियुक्ती देण्यात आली होती. त्यांनी एअर फोर्स टेक्निकल कॉलेज, एअर कमांड अँड स्टाफ कॉलेज (अमेरिका) आणि कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंट (सिकंदराबाद) मधून शिक्षण पूर्ण केले आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले अरोरा हे आयआयटी खडगपूरचे माजी विद्यार्थी असून पुणे विद्यापीठातून व्यवस्थापन विषयात डॉक्टरेट पदवीधारक आहेत.
38 वर्षांच्या आपल्या लक्षणीय कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या कमांड आणि कर्मचारी पदांचा कार्यभार सांभाळला आहे. एअर ऑफिसर-इन-चार्ज (देखभाल) पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी ते महासंचालक (विमान) पदावर कार्यरत होते.
सैनिक सेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना 2018 मध्ये विशिष्ट सेवा पदक आणि 2024 मध्ये अतिविशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या पत्नीचे नाव संगीता असून त्यांना पुलकित नावाचा मुलगा आहे.
***
S.Patil/G.Deoda/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2070255)
Visitor Counter : 22