शिक्षण मंत्रालय
राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर एनएमएमएस अंतर्गत 2024-25 साठी अर्ज (नवीन आणि नूतनीकरण) दाखल करण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली.
Posted On:
01 NOV 2024 6:24PM by PIB Mumbai
2024-25 या वर्षासाठी राष्ट्रीय साधन-सह-योग्यता शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत (NMMSS) निवडलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP) वर अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 15.11.2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल 30 जून 2024 पासून विद्यार्थ्यांद्वारे अर्ज दाखल करण्यासाठी खुले आहे. 2024-25 या प्रकल्प वर्षात, निवडलेल्या विद्यार्थ्यांनी प्रथम राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर एक-वेळ नोंदणी (ओटीआर) करावी आणि त्यानंतर त्यांनी निवडलेल्या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करावा. राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर नोंदणीसाठी अधिक (FAQ) तपशील https://scholarships.gov.in/studentFAQs या संकेतस्थळावर मिळू शकेल.
शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या 'राष्ट्रीय साधन-सह-योग्यता शिष्यवृत्ती योजने' द्वारे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांची प्राथमिक स्तर, म्हणजे इयत्ता आठवी, नंतर होणारी गळती रोखण्यासाठी आणि त्यांचे शालेय शिक्षण उच्च माध्यमिक स्तरापर्यंत म्हणजेच बारावीपर्यंत पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही शिष्यवृत्ती दिली जाते.
ही योजना राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेश सरकारद्वारे आयोजित शिष्यवृत्तीसाठी पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी एक लाख नवीन शिष्यवृत्ती प्रदान करते. विद्यार्थ्याच्या शैक्षणिक कामगिरीच्या आधारे इयत्ता दहावी ते बारावीपर्यंत ही शिष्यवृत्ती नूतनीकरण पद्धतीद्वारे चालू ठेवली जाते. ही योजना फक्त राज्य सरकार, सरकारी अनुदानित आणि स्थानिक संस्था शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना लागू आहे. शिष्यवृत्तीची रक्कम 12000 प्रति विद्यार्थी प्रतिवर्ष इतकी असते.
'राष्ट्रीय साधन-सह-योग्यता शिष्यवृत्ती योजनेची’ (NMMSS) अंमलबजावणी, भारत सरकारद्वारे विद्यार्थ्यांना वितरित केल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनांसाठी एक-थांबा व्यासपीठ असलेल्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल (NSP) द्वारे केली जाते. 01.11.2024 पर्यंत, 86323 नवीन अर्जदारांनी तर 162175 अर्जदारांनी नूतनीकरण अर्ज सादर केले आहेत. एनएमएमएस शिष्यवृत्ती डीबीटी प्रणालीनुसार सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापन प्रणाली (PFMS) द्वारे इलेक्ट्रॉनिक हस्तांतरणाद्वारे, निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट जमा केली जाते. शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठीच्या पात्रता मापदंडांमध्ये - पालकांचे उत्पन्न 3.50 लाख रुपये प्रतिवर्ष पेक्षा जास्त नसावे आणि शिष्यवृत्तीसाठी निवड चाचणी परीक्षेसाठी पात्र ठरण्यासाठी इयत्ता 7 वी परीक्षेत किमान 55% गुण किंवा समतुल्य श्रेणी असणे (अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी 5% शिथिलता) या अटींचा समावेश आहे.
***
S.Patil/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2070246)
Visitor Counter : 58