उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

दीपावलीच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी देशवासीयांना दिलेल्या शुभेच्छा

Posted On: 30 OCT 2024 8:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 ऑक्‍टोबर 2024

 

दीपावलीच्या शुभप्रसंगी, मी भारताच्या सर्व नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि स्नेहपूर्वक अभिवादन करतो.

तिमिरावर प्रकाशाचा, निराशेवर आशेचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या कालजयी विजयाचे प्रतीक असणारा दीपावलीचा सण केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील भारतीय समुदायाद्वारे श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो. 

हा दीपोत्सव, आपल्या सर्वांना नीतिपरायणतेचा  संदेश देतो, तसेच आपली कर्तव्ये सत्यनिष्ठेने  आणि समर्पण भावाने पार पाडण्यासाठी निरंतर प्रेरणा देतो. 

या दीपावलीत अयोध्येतील दीपोत्सव हा खरोखरच एक दिव्य अनुभव असेल, जो आपल्यातील एकी वृद्धिंगत करेल. या दीपोत्सवातील दिव्यांचे तेज जगाला उजळून टाकणारे तर आहेच पण सोबतच ते आपल्या अंतर्मनाला आणि अंतरात्म्याला प्रकाशित करेल.

चला, या दिवाळीला श्रद्धेचे दीप उजळवत आपला मार्ग प्रकाशमय करूया, तसेच एकता, समृद्धी आणि अपार  प्रगतीच्या भविष्याकडे नेणारा भारताचा मार्ग प्रशस्त करूया. या दीपोत्सवाची आभा आपल्या अंतःकरणात ज्ञान, करुणा आणि शांती प्रेरित करो, आपले जीवन समृद्ध बनवो आणि आपल्या सर्वांना आणखी बळ देणारी ठरो. 

सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !

उपराष्ट्रपतींचा संदेश पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

* * *

S.Kakade/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2069733) Visitor Counter : 31