राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय
azadi ka amrit mahotsav

भारताचे सायबर स्वच्छता अभियान म्हणजे तरुणांना शिक्षित आणि सक्षम करून सुरक्षित डिजिटल भारत उभारण्याच्या दिशेने उचललेले पाऊल

Posted On: 29 OCT 2024 8:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 ऑक्‍टोबर 2024

 

राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय (NSCS) आणि युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया (USI) यांनी भारताची सायबर स्वच्छता मोहिम “सायबर स्वच्छता अभियान”चा – एक भाग म्हणून क्वाड सायबर आव्हानाचे आयोजन केले. जबाबदार सायबर परिसंस्था आणखी मजबूत करण्यासाठी, सार्वजनिक संसाधनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि सायबर सुरक्षा जागरुकता वाढवण्यासाठी क्वाड नेत्यांनी क्वाड सायबर चॅलेंज कार्यक्रमाची घोषणा केली होती. सायबर सुरक्षा शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि एक मजबूत कार्यबल तयार करणे ही या वर्षीच्या आव्हानाची संकल्पना आहे. या कार्यक्रमात, प्रख्यात सायबर सुरक्षा तज्ञांनी विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी जागरुकता कार्यशाळा घेतल्या. या तज्ञांनी विद्यार्थ्यांना केवळ सायबर स्वच्छतेच्या सवयी अंगीकारण्यासाठीच नव्हे तर करिअरचा पर्याय म्हणून सायबर सुरक्षेची निवड करण्यास प्रवृत्त केले.

या कार्यक्रमाला केंद्रीय विद्यालय संघटनेने पाठिंबा दिला असून दहा केंद्रीय विद्यालयातील मुख्याध्यापक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला.

सायबर सुरक्षा हे आपल्या देशासाठी प्राधान्याचे क्षेत्र आहे आणि सायबर सुरक्षेमध्ये शिक्षणाची भूमिका सर्वोपरि आहे.  सायबर धोक्यांचा सामना करण्यात शिक्षण महत्त्वपूर्ण भूमिका बजावते यावर मुख्य वक्त्यांनी प्रकाश टाकला. म्हणूनच, केवळ सायबर सुरक्षा शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी नाही तर विद्यार्थ्यांना करिअर पर्याय म्हणून सायबर सुरक्षा घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी देखील शाळांनी त्यांच्या अभ्यासक्रमात सायबर सुरक्षा जागरुकता मॉड्यूल समाविष्ट करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

भारताच्या राष्ट्रीय सायबर सुरक्षा समन्वयकाने विद्यार्थ्यांना सायबर स्वच्छता विकसित करण्यासाठी प्रोत्साहित केले आणि सायबर स्वच्छता अभियान हे सायबर-सुरक्षित भारत निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे यावर प्रकाश टाकला.  आपल्या तरुणांना शिक्षित करून आणि सक्षम बनवून आपण डिजिटल जगात सुरक्षितपणे आणि जबाबदारीने मार्गक्रमण करण्यासाठी सुसज्ज असलेली पिढी तयार करू शकतो, असेही ते म्हणाले. क्वाड सायबर चॅलेंज हे संबंधित देशांमध्ये सायबर सुरक्षा आणि लवचिकता निर्माण करण्याच्या उद्देशाने जागरुकता मोहिमा राबविण्यासाठी हे एक आंतरराष्ट्रीय सहयोगातून उचललेले पाऊल आहे.

कार्यक्रमातील तज्ञ वक्त्यांनी विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी जागरुकता कार्यशाळा घेतल्या. या तज्ञांनी विद्यार्थ्यांना केवळ सायबर क्षेत्रातील चांगल्या पद्धतींचा अवलंब करण्यास प्रवृत्त केले नाही, तर त्यांना त्यांच्या भविष्यातील करिअरच्या पर्यायांमधून, विशेष करून महिलांनी सायबर सुरक्षा क्षेत्र निवडावे यासाठी प्रोत्साहित केले.  तज्ञांनी सायबर कायदा, सायबर गुन्हे आणि तपास पैलू, डिजिटल न्यायवैद्यक, सायबर सुरक्षा करिअर पर्याय आणि मुलांसाठी ऑनलाइन सुरक्षा उपक्रमांबद्दल चर्चा केली.  

 

* * *

N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2069396) Visitor Counter : 35


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil