राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची राष्ट्रपती भवनातील कला प्रदर्शनास भेट
Posted On:
29 OCT 2024 3:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर 2024
कलाकारांच्या एका चमूने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची आज (29 ऑक्टोबर 2024) रोजी भेट घेतली. राष्ट्रपती भवनात वास्तव्यासाठी आलेल्या या कलाकारांनी भवनात भरवलेल्या कला प्रदर्शनाला राष्ट्रपतींनी भेट दिली.
या कलाकृतींमध्ये माणूस आणि निसर्गातील अनंतकालाचा संबंध परावर्तित झाला आहे असे म्हणून राष्ट्रपतींनी प्रदर्शनात मांडलेल्या कलाकृतींची प्रशंसा केली. कलाकृती विकत घेऊन कलाकारांना प्रोत्साहन देण्याची विनंती त्यांनी सर्वांना केली.
राष्ट्रपती भवनात आलेले कलाकार छत्तीसगढ, महाराष्ट्र, ओदिशा, मिझोरम, तेलंगण, उत्तराखंड आणि झारखंडमधील विविध व्याघ्र प्रकल्प क्षेत्रांजवळचे निवासी आहेत. कलाकारांना राष्ट्रपती भवनात निवासाला आमंत्रित करणाऱ्या ‘सृजन 2024’ उपक्रमांतर्गत आलेले हे कलाकार 21 ऑक्टोबरपासून आजवर राष्ट्रपती भवनात वास्तव्याला आहेत. त्यांच्या या मुक्कामात त्यांनी नैसर्गिक रंग वापरून सौरा, गोंड, वारली, ऐपण, सोहराई आदी समकालील आदिवासी कलाप्रकार दर्शवणाऱ्या कलाकृती साकारल्या आहेत.
* * *
N.Chitale/R.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2069194)
Visitor Counter : 17