संरक्षण मंत्रालय
आयएनएस तलवार फ्रान्समधील ला रियुनियन येथे दाखल
प्रविष्टि तिथि:
28 OCT 2024 4:21PM by PIB Mumbai
भारतीय नौदलातील आघाडीची स्टेल्थ फ्रिगेट ‘आयएनएस तलवार’ हिंद महासागर क्षेत्रात तिच्या सध्याच्या तैनातीचा एक भाग म्हणून 27 ऑक्टोबर 2024 रोजी फ्रान्समधील ला रियुनियन येथे पोहोचली. प्रादेशिक सागरी सुरक्षा आव्हानांचा सामना करण्यासाठी भारत-फ्रान्स भागीदारी मजबूत करणे हे ला रियुनियन भेटीचे उद्दिष्ट आहे.
या बंदर भेटीदरम्यान, या जहाजावरील अधिकारी क्रॉस-डेक भेटी देतील आणि फ्रेंच नौदलाशी संवादही साधतील. यापूर्वी, 27 ऑक्टोबर 2024 रोजी हे जहाज भारतीय समुदायाकरिता भेटीसाठी खुले ठेवण्यात आले होते.
भारत आणि फ्रान्समध्ये पारंपरिकरित्या मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि दोन्ही देशात सखोल, चिरस्थायी धोरणात्मक भागीदारी आहे.
आयएनएस तलवार 18 जून 2003 रोजी भारतीय नौदलात सामील झाले आणि ते भारतीय नौदलाच्या पश्चिम नौदल कमांडच्या अंतर्गत असलेल्या पश्चिमी ताफ्याचा एक भाग आहे. या जहाजाचे नेतृत्व सध्या कॅप्टन जिथू जॉर्ज करत आहेत. या जहाजाने अलीकडेच दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आयबीएसएएमएआर VIII बहुपक्षीय युद्ध सरावात भाग घेतला होता.
(10)MOS4.jpeg)
RHD8.jpeg)
***
N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2068924)
आगंतुक पटल : 97