अर्थ मंत्रालय
सीबीडीटी ने प्राप्तिकर कायदा, 1961 (अधिनियम) अंतर्गत 2024-25 या मूल्यांकन वर्षासाठी उत्पन्नाचा परतावा सादर करण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत वाढवली
Posted On:
26 OCT 2024 11:56AM by PIB Mumbai
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) अधिनियमाच्या कलम 139 च्या उप-कलम (1) अंतर्गत 2024-25 या मुल्यांकन वर्षासाठी उत्पन्नाचा परतावा सादर करण्याची देय तारीख 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत वाढवली आहे. अधिनियमाच्या कलम 139 च्या उप-कलम (1) च्या स्पष्टीकरण 2 च्या खंड (a) मध्ये संदर्भित करदात्यांसाठी पूर्वी परतावा सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2024 होती.
सीबीडीटी ने परिपत्रक क्र.13/2024, F.No.225/205/2024/ITA-II दिनांक 26.10.2024 रोजी जारी केले आहे. सदर परिपत्रक www.incometaxindia.gov.in. या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
***
S.Tupe/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2068404)
Visitor Counter : 45