संरक्षण मंत्रालय
एएसडब्ल्यू एसडब्ल्यूसी (जीआरएसई) प्रकल्पातील ‘अभय’ या सातव्या जहाजाचे जलावतरण
Posted On:
25 OCT 2024 10:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर 2024
भारतीय नौदलासाठी मेसर्स जीआरएसई कडून बांधण्यात येणाऱ्या पाणबुडीविरोधी वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट (एएसडब्ल्यू एसडब्ल्यूसी) प्रकल्पातील सातव्या ‘अभय’ जहाजाचे 25 ऑक्टोबर 24 रोजी मेसर्स एल अँड टी, कट्टुपल्ली येथे जलावतरण करण्यात आले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी व्हीएडीएम राजेश पेंढारकर, एफओसी-इन-सी (पूर्व) होते. सागरी परंपरेनुसार, पूर्वीय क्षेत्राच्या अध्यक्ष संध्या पेंढारकर यांनी जहाजाचे लोकार्पण केले.
आठ एएसडब्ल्यू एसडब्ल्यूसी जहाजे बांधण्याच्या करारावर संरक्षण मंत्रालय आणि कोलकात्याच्या गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनीअर्स (जीआरएसई) यांच्यात एप्रिल 19 मध्ये स्वाक्षरी करण्यात आली. अर्नाळा श्रेणीची जहाजे भारतीय नौदलाच्या सेवेत असलेल्या अभय श्रेणीच्या एएसडब्ल्यू कॉर्वेट्सची जागा घेतील आणि ती किनारपट्टी लगतच्या भागात पाणबुडीविरोधी अभियान, कमी तीव्रतेच्या सागरी मोहीम (एलआयएमओ) आणि माईन लेईन्ग कार्य करण्यासाठी याची संरचना करण्यात आली आहे. एएसडब्ल्यू एसडब्ल्यूसी जहाजे सुमारे 77 मीटर लांब आहेत, आणि ती 1800 टन भारासह 25 नॉटिकल माईल चा कमाल वेग मिळवू शकतात.
N.Chitale/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2068311)
Visitor Counter : 53