विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
                
                
                
                
                
                    
                    
                        अत्याधुनिक सामग्री संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी भारत आणि जर्मनी यांच्या संयुक्त जाहीरनाम्यावर स्वाक्षऱ्या 
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                25 OCT 2024 9:34PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर 2024
भारत जर्मनी यांच्यात विज्ञान आणि तंत्रज्ञानात सहकार्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरेल असा संयुक्त जाहीरनामा करण्यात आला आहे.केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि जर्मन संघीय मंत्री बेट्टिना स्टार्क-वॉट्झिंगर यांनी अत्याधुनिक सामग्री संशोधन आणि विकासाला चालना देत परस्पर लाभांश मिळवण्यासाठी सहकार्याच्या उद्देशाने या संदर्भात जाहीरनाम्याची देवाणघेवाण केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ही देवाणघेवाण झाली.

डॉ.जितेंद्र सिंह आणि बेट्टिना स्टार्क-वॉट्झिंगर यांच्यातील द्विपक्षीय चर्चा दोन राष्ट्रप्रमुखांच्या पूर्ण  सत्रापूर्वी झाली आणि ही चर्चा भारत जर्मनी विज्ञान तंत्रज्ञान सहयोगाची सुवर्ण महोत्सवी समारंभाचा  महत्त्वाचा भाग ठरली.
भारत जर्मनी भागीदारी बळकट करण्यासाठी सातत्याने पाठिंबा दिल्याबद्दल स्टार्क-वॉट्झिंगर यांचे डॉ. जितेंद्र सिंह यांनी या भेटीत आभार मानले. ‘कचऱ्यातून संपत्ती’ आणि शाश्वत वेष्टन आदी क्षेत्रांत 2+2 संयुक्त प्रकल्पाची सुरुवात, तसेच शाश्वततेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात प्रस्तावांची नव्याने मागणी असे अलीकडचे सहयोगी यशस्वी प्रयत्न त्यांनी अधोरेखित केले. 
भारत जर्मन विज्ञान आणि तंत्रज्ञान केंद्र – आयजीएसटीसीने संयुक्त संशोधनाला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत 50 पेक्षा अधिक प्रकल्पांना पाठबळ आणि दोन देशांमधील युवा संशोधकांना एकत्र आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची डॉ.जितेंद्र सिंह यांनी प्रशंसा केली.
दोन मंत्र्यांनी हायड्रोजन ऊर्जेबाबत संभाव्य सहयोगाविषयी चर्चा केली; त्यामध्ये डॉ. जितेंद्र सिंह यांनी भारताच्या राष्ट्रीय हायड्रोजन अभियानात संशोधन आणि विकास, उत्पादन व शाश्वत ऊर्जा साठवणुकीसाठी आकर्षक संयुक्त संधी असल्याचे सांगितले.

भेटीअखेरीस,डॉ. जितेंद्र सिंह आणि स्टार्क-वॉट्झिंगर यांनी जैवतंत्रज्ञान, पर्यावरणीय तंत्रज्ञान आणि आरोग्य सेवा यांसारख्या क्षेत्रांत नवोन्मेष व संशोधनाप्रती वचनबद्धता कायम राखण्याच्या निर्धाराचा पुनरुच्चार केला. जगाच्या शाश्वत व संवेदनक्षम भवितव्यासाठी भारत जर्मनी भागीदारीतून नवोन्मेषी उपाययोजना शोधण्यासाठी शैक्षणिक देवाणघेवाणीला पोषक परिस्थितीची निर्मिती व प्रतिभेचा विकास करण्याच्या महत्त्वावर दोन्ही नेत्यांनी भर दिला.
N.Chitale/R.Bedekar/P.Malandkar
 
 
 
 
 
 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai   
 /PIBMumbai   
 /pibmumbai  
pibmumbai[at]gmail[dot]com  
/PIBMumbai   
 /pibmumbai
 
 
 
                
                
                
                
                
                (Release ID: 2068300)
                Visitor Counter : 81