इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

‘आस्क अवर एक्स्पर्ट्स’ मालिकेला प्रारंभ: डिजीलॉकर – भारताच्या डिजिटल वॉलेट’ची वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी नागरिकांचा सरकारबरोबर सहभाग


सरकारी अधिकारी आणि विषय तज्ञांबरोबर नागरिकांच्या थेट संवादासाठी राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स विभागाकडून  'आस्क अवर एक्स्पर्ट्स' मालिकेच्या पहिल्या भागाचे आयोजन

Posted On: 19 OCT 2024 3:21PM by PIB Mumbai

 

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या नॅशनल ई-गव्हर्नन्स विभागाने 18 ऑक्टोबर 2024 रोजी, 'आस्क अवर एक्स्पर्ट्स' या त्यांच्या विशेष लाइव्ह मालिकेच्या पहिल्या भागाची यशस्वीपणे सुरुवात केली. या भागात डिजीलॉकर – भारताचे  डिजिटल वॉलेट यावर प्रामुख्याने भर देण्यात आला.

आस्क अवर एक्स्पर्ट्स’

आस्क अवर एक्स्पर्ट्स’ हा डिजिटल इंडियाच्या यूट्यूब चॅनेलवर (www.youtube.com/@DigitalIndiaofficial) दाखवला जाणारा एक अनोखा साप्ताहिक थेट कार्यक्रम असून नागरिकांबरोबर सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने त्याची रचना केली आहे. हा उपक्रम सरकारी अधिकारी आणि विषय तज्ञांशी थेट संवाद साधण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करतो आणि नागरिकांना विविध डिजिटल इंडिया उपक्रमांबाबत प्रश्न विचारण्याची आणि शंकांचे निरसन करण्याची संधी देतो.

पहिला भाग 'डिजीलॉकर' या प्रमुख ई-गव्हर्नन्स प्लॅटफॉर्मवर केंद्रित होता, जो नागरिकांना महत्वाचे दस्तावेज आणि प्रमाणपत्रे डिजिटल स्वरूपात जतन, सामायिक आणि सत्यापित करण्यासाठी क्लाउड-आधारित सुरक्षित उपाय प्रदान करतो. डिजीलॉकर हा डिजिटल इंडिया कार्यक्रमाचा प्रमुख घटक असून नागरिकांना त्यांचे जीवन सुलभ करण्यासाठी डिजिटल साधनांसह सक्षम बनवतो.

तज्ञांनी सर्वसमावेशक सादरीकरण केले आणि डिजीलॉकरच्या कार्यक्षमतेबद्दल आणि फायद्यांबाबत अभ्यासपूर्ण चर्चा केली. देशभरातून हजारो नागरिकांनी थेट ट्यूनिंग करून या सत्रात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. डिजीलॉकर प्लॅटफॉर्मच्या विविध पैलूंवर स्पष्टीकरण मागण्यासाठी दर्शकांनी उत्सुकतेने तज्ञांना थेट प्रश्न विचारले.

या कार्यक्रमाने विविध भागधारकांनी लक्षणीय सहभाग नोंदवला. संबंधित आणि रोचक प्रश्न विचारल्याबद्दल नऊ सक्रिय सहभागींची डिजिटल इंडिया क्वेश्चन  निन्जा म्हणून निवड करण्यात आली असून त्यांना बक्षीस देण्यात येईल.

डिजीटल इंडियाच्या प्रमुख प्रकल्पांची संकल्पना समजावून सांगणे

डिजिटल इंडिया अंतर्गत  प्रमुख प्रकल्पांची संकल्पना समजावून सांगणे हे या मालिकेचे उद्दिष्ट आहे, ज्यामुळे लोकांना या परिवर्तनात्मक कार्यक्रमाचे व्यवस्थापन आणि संचलन करणाऱ्या तज्ञांकडून थेट ऐकण्याची संधी मिळते. विशेष म्हणजे, दर्शकांना त्यांच्या सहभागासाठी विशेष डिजिटल इंडिया गिफ्ट हॅम्पर्स जिंकण्याची संधी देखील मिळते.

https://youtube.com/live/sewXtW1A31k  या लिंकवर क्लिक करून पूर्ण भाग पाहता येईल. ‘आस्क अवर एक्स्पर्ट्स’ च्या पुढील  भागांसाठी संपर्कात राहा, ज्यात डिजिटल इंडिया उपक्रमांची अधिक सखोल माहिती दिली जाईल!

डिजिटल इंडिया यूट्यूब चॅनेल: https://www.youtube.com/@DigitalIndiaofficial.

***

M.Pange/S.Kane/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 2066323) Visitor Counter : 14


Read this release in: English , Hindi , Urdu , Tamil