संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

थिंक 2024 - स्पर्धेच्या विभागीय फेऱ्यांचा आरंभ


THINQ 2024- भारतीय नौदलाची प्रश्नमंजुषा स्पर्धा- क्षितिजाच्या पलिकडे पहा

Posted On: 18 OCT 2024 7:36PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर 2024


भारतीय नौदलाच्या थिंक - 2024 या राष्ट्रीय स्तरावरील,प्रश्नमंजुषा स्पर्धेने 14 आणि 15 ऑक्टोबर 24 रोजी विभागीय फेऱ्या पूर्ण  करून एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. चारही विभागातील  (उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम) फेऱ्या पूर्ण झाल्या असून उपांत्य  फेरीसाठी विजयी संघ निश्चित झाले आहेत. प्रत्येक  विभागातील  प्रत्येकी चार अव्वल संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरले असून,07 नोव्हेंबर 2024 रोजी प्रमुख  नौदल प्रशिक्षण प्रतिष्ठान, भारतीय नौदल अकादमी, एझिमाला येथे त्यांच्यात  स्पर्धा  होणार आहे.  या 16 संघांपैकी, आठ संघ 08 नोव्हेंबर 2024 रोजी नियोजित असलेल्या अंतिम फेरीत पोहोचतील.

उपांत्य फेरीसाठी पात्र ठरलेल्या विभागनिहाय निवडलेल्या शाळांची यादी पुढीलप्रमाणे आहे:-

उत्तर विभाग

(a) दिल्ली पब्लिक स्कूल, ग्रेटर नोएडा (उत्तर प्रदेश)

(b) शीलिंग हाऊस स्कूल (उत्तर प्रदेश)

(c) डॉ. वीरेंद्र स्वरूप शिक्षण केंद्र, अवधपुरी (उत्तर प्रदेश)

(d) सेठ एम.आर. जयपुरिया स्कूल, गोयल कॅम्पस, लखनौ (उत्तर प्रदेश)

पूर्व विभाग

 (a) श्री शंकर विद्यालय (छत्तीसगड)

 (b) तेजा विद्यालय (तेलंगणा)

(c) दिल्ली पब्लिक स्कूल पाटणा (बिहार)

(d) जॉन्सन ग्रामर स्कूल मल्लापूर (तेलंगणा)

दक्षिण विभाग

(a) असिसी विद्यानिकेतन पब्लिक स्कूल, एर्नाकुलम (केरळ)

(b) विद्या मंदिर वरिष्ठ माध्यमिक विद्यालय, चेन्नई (तामिळनाडू)

(c) एक्सेल पब्लिक स्कूल, म्हैसूर (कर्नाटक)

(d) बी.व्ही.भवनचे राजली विद्याश्रम,चेन्नई (तामिळनाडू)

 पश्चिम विभाग

(a) मुश्तीफंड आर्यन उच्च माध्यमिक विद्यालय (गोवा)

(b) केंब्रिज कोर्ट हायस्कूल (राजस्थान)

(c) जयश्री पेरीवाल हायस्कूल (राजस्थान)

(d)सेंट अँथनीज एसआर सेकंडरी स्कूल (राजस्थान)

‘विकसित भारत’ या संकल्पनेची व्याप्ती उत्तरोत्तर वाढत असून, थिंक-24 हा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांपैकी एक म्हणून उदयास आला आहे. याद्वारे बौद्धिक आदानप्रदान  आणि स्पर्धेसाठी एक मंच प्रदान केला जातो. सहभागी पात्र स्पर्धकांना  आयएनए  येथील अत्याधुनिक प्रशिक्षण सुविधांना भेट देण्याची अनोखी संधी मिळणार आहे.थिंक -2024 या आव्हानात्मक प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात  सहभागी होणाऱ्या सर्व शालेय संघांना भारतीय नौदलाने शुभेच्छा दिल्या आहेत.

 

S.Kakade/S.Patgaonkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 2066200) Visitor Counter : 12


Read this release in: Telugu , English , Urdu , Hindi