दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
ट्राय अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने ‘भू-आधारित प्रसारकांसाठी नियामक आराखडा’ या वर सल्लापत्र जारी केले
Posted On:
18 OCT 2024 4:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर 2024
ट्राय अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने आज ‘भू-आधारित प्रसारकांसाठी नियामकीय आराखड्या’वर आधारित सल्लापत्र जारी केले.
ट्रायच्या www.trai.gov. या संकेतस्थळावर हे सल्लापत्र उपलब्ध आहे. भागधारकांकडून 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत या सल्लापत्रावर लिखित सूचना मागवण्यात आल्या आहेत.कोणाला प्रतिवादी सूचना करायच्या असतील तर त्या 29 नोव्हेंबर 2024 पर्यंत सादर करता येतील. सूचना तसेच प्रतिवादी सूचना, शक्यतो, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात, IDadvbcs-2@trai.gov.in आणि jtadv-bcs@trai.gov.in या ईमेल आयडीवर पाठवाव्यात.
या संदर्भातील कोणतेही स्पष्टीकरण/माहिती मिळवण्यासाठी कृपया सल्लागार (बी आणि सीएस विभाग) दीपक शर्मा यांच्याशी +91-11-20907774 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
S.Kakade/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2066080)
Visitor Counter : 38