अर्थ मंत्रालय
पगारदार कर्मचाऱ्यांसाठी भरलेला टीसीएस /कापलेल्या टीडीएस रकमेच्या दाव्यांमध्ये सुलभता आणण्यासाठी आणि पालकांना अल्पवयीन मुलांच्यावतीने ‘टीसीएस क्रेडिट’ दावा करण्यास सक्षम बनवण्यासाठी सीबीटीडीकडून प्राप्तीकर नियमांमध्ये सुधारणा अधिसूचित
Posted On:
17 OCT 2024 4:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर 2024
पगारदार कर्मचाऱ्यांसाठी भरलेला टीसीएस /कापलेल्या टीडीएस रकमेच्या दाव्यांमध्ये सुलभता आणण्यासाठी आणि पालकांना अल्पवयीन मुलांच्यावतीने ‘टीसीएस क्रेडिट’ दावा करण्यास सक्षम बनवण्यासाठी सीबीडीटी म्हणजेच केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने प्राप्तीकर नियमांमध्ये सुधारणा अधिसूचित केल्या आहेत. प्राप्तीकर कायदा, 1961 (अधिनियम) च्या कलम 192 च्या उप-कलम (2बी) मध्ये चॅप्टर -XVII-B किंवा चॅप्टर - XVII-BB च्या तरतुदींनुसार पगारदार कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कर वजावटीसाठी टीडीएस किंवा टीसीएस समाविष्ट करण्यासाठी वित्त (क्रमांक 2) कायदा, 2024 (एफ ए (क्रमांक 2)) द्वारे सुधारणा करण्यात आली.
दिनांक 15.10.2024 च्या सीबीडीटी अधिसूचना क्र. 112/2024 द्वारे, प्राप्तिकर नियम, 1962 ('नियम') मध्ये सुधारणा करण्यात आली आहे, ज्यामध्ये उप-कलम (2B) अंतर्गत आवश्यक तपशीलांचे विहित विधान म्हणून अधिनियम कलम 192 अंतर्गत- 12BAA फॉर्म जारी करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांनी हे तपशील त्यांच्या नियोक्त्यांना प्रदान करणे आवश्यक आहे, जे कलम 192 च्या उप-कलम (1) अंतर्गत देयके देण्यास जबाबदार आहेत. नियोक्ता, या अर्जात दिलेला तपशील विचारात घेतल्यानंतर पगारावर टीडीएस कापून घेईल.
तसेच ,कायद्याच्या कलम 206C च्या उप-कलम (4) मध्ये FA (क्रमांक 2) द्वारे टीसीएस क्रेडिट हे इतर व्यक्तीला-जसे की, अल्पवयीन मुलांच्या बाबतीत त्यांच्या पालकांना देण्यासाठी सुधारणा करण्यात आली आहे, ज्यात अल्पवयीन व्यक्तीचे उत्पन्न पालकांच्या उत्पन्नासह एकत्रित केले जाते. त्यानुसार दिनांक 16.10.2024 च्या सीबीडीटी अधिसूचना क्र. 114/2024 मध्ये नियम 37-I मध्ये टीसीएस क्रेडिट घेणाऱ्या व्यक्ती व्यतिरिक्त, ज्या व्यक्तीचे उत्पन्न मोजण्यायोग्य आहे, अशा व्यक्तीला टीसीएस ‘क्रेडिट’ देण्याची अनुमती देण्यासाठी सुधारणा करण्यात आली आहे.
या संदर्भातील सूचना येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. www.incometaxindia.gov.in
S.Kane/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2065818)
Visitor Counter : 76