आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया सिंग पटेल यांनी केले 19व्या आंतरराष्ट्रीय औषध नियामक प्राधिकरणांच्या परिषदेला संबोधित


"सर्वांसाठी सुरक्षित आणि प्रभावी औषधे सुनिश्चित करणे यासाठी आंतरराष्ट्रीय औषध नियामक प्राधिकरण(आयसीडीआरए) यांनी ज्ञानाची देवाणघेवाण, भागीदारी निर्माण करणे आणि एकरूपतेने केलेले काम महत्त्वपूर्ण आहे,"- अनुप्रिया सिंग पटेल

Posted On: 16 OCT 2024 6:37AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर 2024

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया सिंग पटेल यांनी 19व्या आंतरराष्ट्रीय औषध नियामक प्राधिकरणांच्या परिषदेला संबोधित केले.

सर्वांसाठी सुरक्षित आणि प्रभावी औषधे सुनिश्चित करणे यासाठी आयसीडीआरए यांची ज्ञानाची देवाणघेवाण, भागीदारी निर्माण करणे आणि एकत्रितपणे काम करण्यासाठीचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया सिंग पटेल यांनी आज 19व्या आंतरराष्ट्रीय औषध नियामक प्राधिकरणांच्या परिषदेत (आयसीडीआरए) त्यांच्या भाषणात सांगितले. यावेळी नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल देखील उपस्थित होते.

हा कार्यक्रम 14 ते 18 ऑक्टोबर दरम्यान केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना (सीडीएससीओ), आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, आणि जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) यांच्या सहकार्याने भारतात पहिल्यांदाच आयोजित केला जात आहे, ज्यात 200 हून अधिक देशांमधील नियामक प्राधिकरणे, धोरणकर्ते आणि आरोग्य अधिकारी एकत्र आले आहेत.

केंद्रीय मंत्र्यांनी नमूद केले की भारताला अलीकडे  आयएमडीआरएफचे सहयोगी सदस्य म्हणून मान्यता मिळाली आहे. "भारतीय फार्माकोपियाला फार्माकोपियल डिस्कशन ग्रुप (पीडीजी) द्वारे मिळालेली मान्यता ही नियामक मानकांच्या एकरूपीपणाच्या आणि मान्यतेची आणखी एक महत्त्वपूर्ण पायरी आहे," असेही त्यांनी नमूद केले.

पटेल यांनी अधोरेखित केले की अलीकडे प्रकाशित केलेले पुनरावृत्त शेड्यूल एम  जागतिक आरोग्य संघटनेच्या चांगल्या उत्पादन पद्धतींशी सुसंगत आहे, ज्यात जैविक उत्पादने, अन्वेषणात्मक उत्पादने यांसारख्या विविध उत्पादनांसाठीच्या उत्पादन प्रक्रियेचा समावेश आहे, हे नियामक एकसंधतेचे उद्दिष्ट साध्य करण्यास मदत करतात.

या प्रसंगी बोलताना डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले, "गुणवत्तापूर्ण औषधे जीवनाची गुणवत्ता सुधारतात, मानवी उत्पादकता तसेच जीवनशैली सुधारतात." कोविड-19 महामारीनंतर या वर्षीचे आयसीडीआरए जागतिक नियामक वातावरण मजबूत करण्यासाठीच्या त्याच्या वचनबद्धतेमुळे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

आरोग्य संशोधन विभागाचे सचिव आणि आयसीएमआर महासंचालक डॉ. राजीव बहल यांनी आरोग्य संशोधनामध्ये नियामकांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली.

जागतिक आरोग्य संघटनेच्या सहायक महासंचालक डॉ. युकिको नाकाटिनी यांनी नमूद केले की आयसीडीआरए 2024 ही कोविड-19 महामारीनंतरची पहिली आयसीडीआरए परिषद आहे. त्यांनी असे सांगितले की महामारीने अधोरेखित केलेली एक तातडीची गरज म्हणजे मजबूत नियामक प्रणालीची आवश्यकता ही होय.अमेरिकन अन्न आणि औषधी प्रशासनाच्या उपायुक्त किम्बर्ली ट्रेझियाक यांनी प्रगत औषध उत्पादन पद्धतींच्या परिचयामुळे निर्माण झालेल्या संधी आणि जोखमींचे विश्लेषण केले तसेच पारंपरिक पद्धतींशी त्याचा तुलनात्मक आलेख मांडला. त्यांनी गुणवत्तेचे पालन सुनिश्चित करण्याच्या गरजेवर जोर दिला आणि जगभरातील औषध नियामक संस्थांमधील सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले.

S.Patil/G.Deoda/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 2065514) Visitor Counter : 16