ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित,विश्वासार्ह आणि उच्च दर्जाची उत्पादने आणि सेवा मिळण्याची सुनिश्चिती करा : प्रल्हाद जोशी


वस्तूंच्या मानकांसंदर्भात जनजागृती करणे,ग्राहकांचे सक्षमीकरण करण्यासाठी आवश्यक : जोशी यांचे प्रतिपादन

Posted On: 14 OCT 2024 9:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर 2024

भारतातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित, विश्वासार्ह आणि उच्च दर्जाची सुविधा उत्पादने आणि सेवा मिळतील, यासाठी भारतीय मानक ब्युरोने सुनिश्चित करणे आवश्यक आहे,असे केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री  प्रल्हाद जोशी, यांनी आज नवी दिल्ली येथे जागतिक मानक दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात आपल्या प्रमुख भाषणात सांगितले.ग्राहकांचे कल्याण हे दर्जेदार उत्पादनांच्या उपलब्धतेवर अवलंबून असते तर उद्योगाची वाढ आणि नफा हा उच्च दर्जाच्या वस्तूंच्या मागणीशी थेट जोडलेला असतो,असे ही ते पुढे म्हणाले.ग्राहक आणि उत्पादक यांचे परस्परांवर अववलंबित्व असते,हे मान्य करणे हा उत्तम दर्जाची व्यवस्था निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारा  सर्वांगीण दृष्टीकोन आहे,असे ही त्यांनी यावेळी नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनानुसार देशाला त्याच्या सर्वोत्तम गुणवत्तेसाठी ओळखले जावे आणि भारताने स्वत:ला जागतिक मानकांनुसार सुयोग्य बनवण्याचा प्रयत्न करावा यावर  जोशी यांनी भर दिला.भारताची अर्थव्यवस्था जागतिक व्यापारातील योगदानासह वेगाने वाढत आहे,म्हणून बीआयएसने गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.आर्थिक वृद्धी अधिक समृद्ध करण्यात,‘मेड इन इंडिया’ लेबल लोकप्रिय करण्यात आणि जागतिक स्तरावर भारताचा ब्रँड प्रस्थापित  करण्यात बीआयएसची मोठी भूमिका आहे यावर त्यांनी भर दिला.

उत्पादनांच्या मानकीकरणासाठी बीआयएस  करत असलेल्या अथक प्रयत्नांची प्रशंसा करताना  जोशी म्हणाले, की आज 22,300 पेक्षा जास्त मानके लागू आहेत आणि 94% भारतीय मानके ISO आणि ISE मानकांशी सुसंगत आहेत.

केंद्रीय मंत्री म्हणाले,की ग्राहकांच्या अधिक सक्षमीकरणासाठी मानकांविषयी जनजागृती करणे आवश्यक आहे. केंद्रीय मंत्री म्हणाले की, BIS द्वारे राबविण्यात येत असलेल्या मानकीकरण कार्यक्रमांमध्ये नागरिकांत अधिक  व्यापक स्वरूपात स्वारस्य आणि जागरूकता निर्माण करणे हे सरकारसमोरील आव्हान आहे. कोणतेही उत्पादन खरेदी करण्यापूर्वी ग्राहक आयएसआय कोड तपासून पहातील आणि बीआयएस प्रमाणपत्र पारखून घेतील,या विषयी जनजागृती करून हे मानदंड प्रस्थापित करणे आपल्याला सुनिश्चित करावे लागेल.

जोशी म्हणाले की, सध्या जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या भारताने दर्जा सुधारण्यावर भर दिला पाहिजे कारण ते समाजाचा कणा म्हणून काम करतात,सुरक्षितता,गुणवत्ता आणि उत्पादन आणि सेवेवर विश्वास ठेवतात.तांत्रिक विकास,औद्योगिक वाढ आणि समाजाच्या कल्याणासाठी ही मानके उत्प्रेरक म्हणून काम करतात.  ते देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापार सुलभ करतात आणि आर्थिक वाढ आणि पर्यावरणीय स्थिरता या दोन्हीसाठी योगदान देतात,असेही त्यांनी यावेळी त्यांनी नमूद केले.

यानंतर जोशी असे म्हणाले, की व्यवसायांसाठी मानकीकरण सुनिश्चित करण्याच्या प्रक्रियेमुळे, प्रणाली सुधारतात आणि इतर बाजारांशी सुसंगत होऊन ग्राहकांच्या संतोषाला समर्थन मिळते, तर ग्राहकांसाठी मानके उत्पादनांची विश्वासार्हता, सातत्य आणि सुरक्षितता आणि आंतरकार्यक्षमता सुनिश्चित करतात.

कार्यक्रमादरम्यान जोशी यांनी BIS केअर ॲप 3.0 यांचे प्रकाशन केले.BIS CARE ॲप ग्राहकांना सक्षम करण्यासाठी वन स्टॉप युटिलिटी प्लॅटफॉर्म आहे.

 


N.Chitale/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2064858) Visitor Counter : 45