कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने स्किल इंडिया मोहिमेत कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील सहाय्यासाठी आणि राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थांमधील 5 उत्कृष्टता केंद्रांच्या स्थापनेसाठी मेटा समवेत केली भागीदारी
प्रविष्टि तिथि:
14 OCT 2024 7:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर 2024
कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने आज मेटा सोबत दोन प्रमुख उपक्रम सुरू करण्यासाठी आपली भागीदारी जाहीर केली: स्किल इंडिया मिशनसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता सहयोग आणि हैदराबाद, बेंगळुरू, जोधपूर, चेन्नई आणि कानपूर येथील राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थांमध्ये व्हर्च्युअल रिॲलिटी आणि मिक्सड रिॲलिटी क्षेत्रात 5 उत्कृष्टता केंद्र स्थापन करणे हे यामागील उद्दिष्ट आहे.

सध्याच्या स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी भारतातील युवावर्गाला कौशल्य प्रदान करून सक्षम करणे हा आमच्या मंत्रालयाचा हेतू असल्याचे कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार),जयंत चौधरी, यांनी या भागीदारीवर भाष्य करताना सांगितले. स्किल इंडिया परिसंस्थेत कृत्रिम बुद्धिमत्ता, व्हर्च्युअल रिॲलिटी, मिक्सड रिॲलिटी यांसारख्या तंत्रज्ञानाचा समावेश करून आपण वैयक्तिक पातळीवर शिक्षणाचे मार्ग खुले करणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ देशातील प्रत्येक युवकयुवतील मिळावा यादृष्टीने कार्य करत आहोत, आम्ही आज मेटा सोबत केलेली भागीदारी ही या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे, असे त्यांनी सांगितले.
या भागीदारीअंतर्गत, मेटाच्या ओपन-सोर्स लामा मॉडेल द्वारा संचालित असलेला एक नाविन्यपूर्ण AI-चॅटबॉट विकसित केला जाईल, जो स्किल इंडिया डिजिटल (SID) पोर्टलवर शिकणाऱ्यांना एक उत्तम अनुभव देईल. स्किल इंडिया डिजिटल पोर्टलमध्ये चॅटबॉट समाविष्ट केला जाईल आणि त्यामुळे वापरकर्त्यांना 24 तास सहाय्य मिळू शकेल. याशिवाय अभ्यासक्रमाविषयी माहितीचा स्रोत, अभ्यासक्रम विषयक सामग्रीसाठी परस्परसंवादी प्रश्नोत्तरे, व्याख्यान सारांश आणि पुन्हा उजळणी करण्यासाठी हे व्हिडिओ उपलब्ध केले जातील.व्हॉट्सॲपवर उपलब्ध असणाऱ्या या चॅटबॉट मध्ये इंग्रजी, हिंदी आणि हिंग्लिश भाषांचा पर्याय असेल, तसेच व्हॉइस क्षमतेसह भारतातील विविध वापरकर्त्यांसाठी ते अधिक अनुकूल असेल. याव्यतिरिक्त, वापरकर्ते विशिष्ट अभ्यासक्रमाचे विषय शोधू शकतात, कौशल्य केंद्रे शोधू शकतात, स्थान आणि स्वारस्य यावर आधारित नोकरीच्या सूची शोधू शकतात आणि सातत्यपूर्ण सुधारणेसाठी अनुकूल अभिप्राय प्राप्त करू शकतात.

भारताच्या कृत्रिम बुद्धिमत्ता परिसंस्थेमध्ये मेटाचे ओपन-सोर्स कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल्सचा समावेश करून, भारताच्या कृत्रिम बुद्धिमत्ता मिशनच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात सामाजिक-आर्थिक परिवर्तनाला चालना देण्याच्या क्षमतेसह प्रभावी ए आय पद्धतींचा अवलंब करण्यासाठी समन्वय साधणाऱ्या ई-गव्हर्नन्स फ्रेमवर्कची कल्पना यात अंतर्भूत आहे. तसेच, राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थांमधील ही 5 उत्कृष्टता केंद्रे कौशल्ये शिकण्यासाठी आणि ज्ञान वृद्धीसाठी शिकणाऱ्यांना आणि प्रशिक्षकांना सुरक्षित, पूर्णपणे केंद्रित आणि आकर्षक वातावरणात नवनवीन व्हर्चुअल रिऍलिटी तंत्रज्ञानाने सुसज्ज असतील. एआय असिस्टंटवरील भागीदारीचा उद्देश माहितीचा प्रवेश सुलभ करणे, शिक्षण अधिक प्रभावी करणे आणि विद्यार्थ्यांना डिजिटल इंटरफेसद्वारे अखंड मार्गदर्शन करणे आहे हा आहे.
स्किल इंडिया डिजिटल पोर्टल हे देशाच्या कौशल्य परिसंस्थेचा आधारशिला बनले आहे, लाखो विद्यार्थी त्यांची रोजगारक्षमता सुधारण्याच्या उद्देशाने अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश करत आहेत. AI चॅटबॉट लाँच केल्यामुळे, एम एस डी ई आणि मेटाच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमासह संवाद आणि भविष्यासाठी तयारी कशी करावी या दिशेने सुरु असलेल्या क्रांतीमध्ये एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकले आहे.
N.Chitale/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2064810)
आगंतुक पटल : 100