कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्सतर्फे बिमस्टेक राष्ट्रे आणि मालदीवमधील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दोन आठवड्यांचे प्रशिक्षण सुरू

Posted On: 14 OCT 2024 5:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर 2024


नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स (एनसीजी) अर्थात राष्ट्रीय सुशासन केंद्राने मालदीवच्या नागरी सेवकांसाठीच्या 34 व्या क्षमता बांधणी कार्यक्रमासोबतच बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी-सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन (बिमस्टेक) देशांच्या नागरी सेवकांसाठी पहिला करिअर दरम्यान प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. हा दोन आठवड्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम 14 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर 2024 या कालावधीत मसुरी आणि नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला असून श्रीलंका, म्यानमार, नेपाळ आणि भूतानसह बिमस्टेक देशांतील एकूण 36 सरकारी कर्मचारी  या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. याव्यतिरिक्त, मालदीवमधील 35 सरकारी कर्मचारी  34 व्या क्षमता बांधणी कार्यक्रमात सहभागी होत आहेत. सहभागी हे विभागीय सचिव,अतिरिक्त जिल्हा सचिव, उपमुख्य सचिव आणि सहाय्यक आयुक्त, संचालक, कौन्सिल एक्झिक्युटिव्ह म्हणून त्यांच्या देशांतील प्रमुख मंत्रालयांचे प्रतिनिधित्व करत आहेत.

एनसीजीसी चे महासंचालक आणि प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी (डीएआरपीजी) विभागाचे सचिव व्ही. श्रीनिवास यांनी आपल्या भाषणात, प्रशासकीय सुधारणांचे उदयोन्मुख क्षेत्र आणि डिजिटल प्रशासनाची महत्वपूर्ण भूमिका विशद करताना सरकारी कर्मचाऱ्यांच्या कौशल्यांमध्ये वाढ करण्याच्या कार्यक्रमाच्या उद्देशावर भर दिला. हे प्रशिक्षण नागरिक-केंद्रित प्रशासन मॉडेल्सवर लक्ष केंद्रित करेल; सरकारी कार्यालये आणि ते सेवा देणारे लोक यांच्यातील अंतर कमी करून सार्वजनिक सेवा वितरणात सुधारणा करण्याचा प्रशिक्षणाचा उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत, बिमस्टेक देश आणि मालदीवमधील सहभागी अधिकारी इंदिरा गांधी राष्ट्रीय वन अकादमी, स्मार्ट सिटी प्रकल्प आणि आयटीडीए, डेहराडूनमधील स्मार्ट शाळा, हरियाणा सार्वजनिक प्रशासन संस्था, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) आणि राष्ट्रीय विज्ञान केंद्र यासह प्रमुख संस्था आणि प्रकल्पांना भेट देतील. याव्यतिरिक्त, ते मारुती उद्योग लिमिटेडला भेट देतील आणि ऐतिहासिक ताजमहाललाही भेट देतील.

N.Chitale/V.Joshi/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 



(Release ID: 2064743) Visitor Counter : 21


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil