संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पहिल्या ट्रेनिंग स्क्वाड्रन ची मस्कत ओमान भेट पूर्ण

Posted On: 12 OCT 2024 6:12PM by PIB Mumbai

 

भारतीय नौदलाची प्रथम प्रशिक्षण स्क्वाड्रन (1टीएस) ची तीर, शार्दुल ही जहाजे आणि भारतीय तटरक्षक जहाज वीरा यांचा मस्कत, ओमान दौरा 9 ऑक्टोबर 24 रोजी पूर्ण झाला. या चार दिवसाच्या भेटीमध्ये भारतीय नौदलाने ओमानच्या रॉयल नेव्ही बरोबर अनेक संयुक्त उपक्रमात भाग घेत या दोन्ही सागरी देशांमधील संबंध आणि सागरी क्षेत्रामधील विद्यमान संरक्षण संबंध आणखी मजबूत केले.

व्हाइस ऍडमिरल व्ही श्रीनिवास फ्लॅग अधिकारी कमांडिंग इन चीफ दक्षिणी नेवल कमांड (FOCINC SOUTH) यांनी एफओसीआयएनसी दक्षिण व्हाईस ऍडमिरल अब्दुल्ला बिन खामिस बिन अब्दुल्ला अल रायसी, चीफ ऑफ स्टाफ सुल्तान्स आर्म्ड फोर्सेज (सीओएसएसएएफ) आणि रिअर ऍडमिरल सैफ बिन नासेर बिन मोहसेन अल-राहबी, ओमानच्या रॉयल नेव्हीचे कमांडर (CRNO) यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली . परस्परप्रशिक्षण , ज्ञानाचे आदान प्रदान आणि संयुक्त प्रशिक्षण सराव या माध्यमातून दोन्ही देशांमधील संरक्षण बंध दृढ करणे यावर या भेटीचा भर होता. या भेटीत FOCIN SOUTH यांनी दोन्ही देशांमध्ये धोरणात्मक भागीदारीचे महात्म्य वाढवण्याच्या दृष्टीने दोन्ही नौदलात अधिक सहकार्य आणि परस्पर सहयोगी कार्य  यावर भर दिला.

भारतीय नौदल शिष्टटमंडळांने सैद बीन सुलतान नौदल तळाला भेट दिली आणि जहाजे देखभाल युनिट तसेच वैद्यकीय व्यवस्था याची मार्गदर्शनक  टूर केली. 1TS वरील  सागरी प्रशिक्षणार्थींनी विविध सुविधा तसेच सिम्युलेटर ना भेटी दिल्या. यामध्ये सुलतान कबूज नौदल अकादमीतील क्रीडा संकुलाचा समावेश होता. प्रशिक्षणार्थींना फ्लॅट मेंटेनन्स युनिट तसेच सैन्य तुकडी वाहून नेणारे ओमानच्या रॉयल नेव्हीचे जहाज अल नसीर याला सुद्धा भेट दिली. ओमानच्या ‌रॉयल नेव्हीच्या कर्मचाऱ्यांनी क्रॉस डेक भेटीचा भाग म्हणून 1TS मधील जहाजांना भेट दिली आणि परस्पर संवाद साधला तसेच एकमेकांमधील उत्कृष्ट उपक्रमांची देवाणघेवाण केली आणि त्याद्वारे उत्तम संबंध जोपासणे आणि मैत्री वाढवणे साध्य केले.

1ITS द्वारे राबवण्यात आलेल्या शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे  या  उपक्रमा द्वारे शालेय मुलांना भारतीय नौदलाची भूमिका आणि क्षमता यांची झलक दाखवण्यात आली. अजून एका उपक्रमात भारतीय नौदल सिम्फनिक बँडने ओमान अवेन्यूज मॉलमध्ये एक मंत्रमुग्ध करणारा आणि सांस्कृतिक सीमांना पार करणारा म्युझिक शो सादर केला.

विजया श्रीनिवासन, अध्यक्ष नौदल कल्याण आणि स्वास्थ्य असोसिएशन (दक्षिण प्रभाग ) यांनी अर्ली इंटरनॅशनल सेंटरच्या A.B.L.E. वाडी कबीर इंडियन स्कूलला भेट दिली. त्यांनी अध्यापक तसेच दिव्यांग मुले यांच्याशी संवाद साधला. आणि शाळा घेत असलेल्या पुढाकाराबद्दल प्रशंसा केली.

जहाजांना दिलेल्या भेटीदरम्यान शालेय विद्यार्थी, सल्तनत ऑफ ओमान येथील  भारतीय वकिलातीतील सदस्य आणि भारतीय समुदायांनी जहाजांना भेटी दिल्या . सल्तनत ऑफ ओमान मधील भारतीय राजदूत अमित नारंग यांनी 1TS मधील भारतीय जहाजांना भेटी दिल्या आणि समुद्रात वरील प्रशिक्षणार्थींचे संवाद सत्र घेतले.

व्हाइस एडमिरल भी श्रीनिवास F O C I N C SOUTH यांनी 1TS जहाजावर भेटीगाठींचा समारंभ आयोजित केला . सल्तनत ऑफ ओमान मधील भारतीय राजपूत अमित नारंग आणि कमांडर अली अल बालुशी सहाय्यक चीफ ऑफ स्टाफ सुलतान आर्म्ड फॉर्सेस (एडमिन आणि लॉजिस्टिक्स ) यांनी यात भाग घेतला. या कार्यक्रमात अनेक अधिकारी, ओमानी मान्यवर आणि इतर मान्यवर पाहुणे सहभागी झाले.

भारतीय नौदल जहाजांची सल्तनत ऑफ ओमानला दिलेली भेट ही उत्साहाने पार पडली आणि त्यामुळे दोन्ही देशांमध्ये बंध अधिक दृढ झाले तसेच या दोन सागर सान्निध्य असणाऱ्या  देशांमधील दीर्घकाळचे बंध अधिक दृढ झाले.

***

S.Patil/V.Sahajrao/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2064458) Visitor Counter : 57


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil