महिला आणि बालविकास मंत्रालय
‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अंतर्गत आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त यंदा देशभरात दहा दिवस विविध उपक्रम
मुलींना सक्षम करणे, ही केवळ जबाबदारी नाही; तर उज्ज्वल भविष्यासाठी ती आमची दूरदृष्टी : अन्नपूर्णा देवी
Posted On:
11 OCT 2024 9:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर 2024
भारत सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली 2 ते 11 ऑक्टोबर या कालावधीत 10 दिवस आंतरराष्ट्रीय बालिका दिनाचा राष्ट्रीय उत्सव साजरा केला. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या अंतर्गत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी या 10 दिवसांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले.
देशभरात, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये समुदाय आणि भागधारक यांच्यासाठी मुलींच्या हक्कांबद्दल चर्चा सत्रांचे आयोजन केले. त्यांना येणाऱ्या आव्हानांविषयी जागरूकता निर्माण केली. तसेच मुलींचे शिक्षण आणि सक्षमीकरणाला पाठिंबा देणाऱ्या उपक्रमांना प्रोत्साहन दिले. या उपक्रमांमध्ये वृक्षारोपण मोहीम, शालेय स्तरावरच्या गुणवंत मुलींचा सत्कार, "सेल्फी विथ डॉटर्स" मोहीम, कन्या पूजन समारंभ, आरोग्य शिबिरे, परिसंवाद, चर्चासत्रे आणि क्रीडा स्पर्धा, मुलींचा सक्रिय सहभाग आणि सर्जनशीलता वाढवणा-या उपक्रमांचा समावेश होता.
आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी बोलताना म्हणाल्या "आपल्या मुलींना सक्षम करणे ही केवळ जबाबदारी नाही; तर त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा आम्ही स्वीकारलेला आमचा दृष्टीकोन आहे. त्यांचे हक्क आणि क्षमता ओळखून, प्रत्येक मुलीची प्रगती होईल, अशा न्याय्य समाजासाठी आपण मार्ग मोकळा करू शकतो."
विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये आंतरराष्ट्रीय बालिका दिनाच्या विशेष कार्यक्रमाची एक झलक खालील चित्रांव्दारे पाहता येईल:
गुजरात:
दहा दिवस विविध उपक्रमांव्दारे हा दिन साजरा केला. मुलींच्या हक्कांबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी परिसंवाद, सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी रॅली आणि मुलींचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या रांगोळी स्पर्धांचा समावेश यामध्ये होता.
बिहार :
अंगणवाडी केंद्रांवर वृक्षारोपण मोहीम आणि जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या.
गोवा:
मुलींच्या सक्षमीकरणाला प्रोसाहन देवून याविषयी जागरूकता वाढवण्यासाठी भीत्तिपत्रक तयाार करणे आणि घोषवाक्य लेखन स्पर्धा घेण्यात आल्या. याबरोबरच ‘गोद भराई’ आणि दांडिया चित्रकला कार्यक्रमाचे आयोजन केले. अशा विविध उपक्रमांमुळे सामुदायिक सहभाग वाढण्यास मदत झाली. यावेळी मुलींचे पालनपोषण आणि मुलींचे संगोपन साजरे करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
* * *
N.Chitale/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2064280)
Visitor Counter : 59