नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने प्रधानमंत्री-सूर्य घर योजनेंतर्गत 500 कोटी रुपयांच्या ‘नवोन्मेषी प्रकल्प’ घटकासाठी अधिसूचित केली योजना मार्गदर्शक तत्त्वे

Posted On: 11 OCT 2024 7:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 ऑक्‍टोबर 2024

 

केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने 8 ऑक्टोबर 2024 रोजी प्रधानमंत्री-सूर्य घर: मोफत वीज योजनेअंतर्गत 'नवोन्मेषी प्रकल्पांच्या' अंमलबजावणीसाठी योजना मार्गदर्शक तत्त्वे अधिसूचित  केली आहेत.

या योजनेच्या 'नवोन्मेषी प्रकल्प' घटकांतर्गत, छतावरील सौर उर्जा  तंत्रज्ञान, व्यवसाय प्रारुप आणि एकत्रीकरण तंत्रांमध्ये प्रगतीला प्रोत्साहन देण्यासाठी 500 कोटी रुपयांचा निधी निर्धारित केला आहे.  ब्लॉकचेन-आधारित पीअर-टू-पीअर सोलार ट्रेडिंग, स्मार्ट मटेरियल आणि इलेक्ट्रिक वाहने तसेच बॅटरी स्टोरेजसह रूफटॉप सोलर यांसारख्या उदयोन्मुख पर्यायांवर लक्ष केंद्रित करून, नवीन संकल्पनात्मक प्रयोग करण्यासाठी स्टार्टअप्स, संस्था आणि उद्योग निश्चित करुन त्यांना समर्थन देण्यासाठी हा घटक आहे.

हे उद्दिष्ट पुढे नेण्यासाठी, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय प्रस्ताव आमंत्रित करेल तसेच संयुक्त संशोधन आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यांला  प्रोत्साहन देईल. राष्ट्रीय सौर उर्जा संस्था  नवोन्मेषी प्रकल्प घटकांसाठी योजना अंमलबजावणी संस्था  म्हणून काम करेल.  निवडलेल्या प्रकल्पांना प्रकल्प खर्चाच्या 60% किंवा 30 कोटी रुपये, यापैकी जे कमी असेल तितके आर्थिक सहाय्य मिळेल.  याव्यतिरिक्त, पुढील प्रगतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने नवोन्मेषासाठी 1 कोटी रुपये पर्यंतची बक्षिसे वार्षिक पुरस्काराच्या रूपात दिले जातील.

सौर उर्जा  क्षमतेचा वाटा वाढवणे आणि निवासी कुटुंबांना स्वतःची वीज निर्मिती करण्यासाठी सक्षम करणे या उद्देशाने भारत सरकारने 29 फेब्रुवारी 2024 रोजी प्रधानमंत्री-सूर्य घर: मोफत वीज योजनेला मंजुरी दिली आहे.  या योजनेचा खर्च  75,021 कोटी रुपये असून  ती आर्थिक वर्ष 2026-27 पर्यंत लागू केली जाणार आहे.  या योजनेची मार्गदर्शक तत्त्वे येथे वाचता येऊ शकतात.

 

* * *

N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2064257) Visitor Counter : 12


Read this release in: English , Urdu , Hindi , Kannada