संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एलएसएएम 12 (यार्ड 80) नौदलाकडे सुपूर्द

Posted On: 11 OCT 2024 10:08AM by PIB Mumbai

भारतीय नौदलासाठी एमएसएमई  शिपयार्ड मेसर्स सेकॉन इंजिनीअरिंग प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, विशाखापट्टणम ने तयार केलेल्या  'क्षेपणास्त्र  कम दारुगोळा बार्ज, एलएसएएम  12 (यार्ड  80) 10 ऑक्टोबर 24 रोजी मेसर्स विनयगा मरीन पेट्रो लिमिटेड, मीरा भाईंदर, महाराष्ट्र  (मेसर्स सेकॉन इंजिनीअरिंग प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे लॉन्च साइट) येथे नौदलाकडे सुपूर्द करण्यात आला.  08 x क्षेपणास्त्र कम ॲम्युनिशन बार्ज प्रकल्पातील हा सहावा बार्ज आहे.  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कमोडोर एमव्ही राज कृष्णा, सीओवाई (एमबीआय ) होते.
08 x क्षेपणास्त्र आणि  दारुगोळा  बार्जच्या निर्मितीसाठी  9 फेब्रुवारी 21 रोजी संरक्षण मंत्रालय आणि सेकॉन इंजिनीअरिंग प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, विशाखापट्टणम यांच्यात  करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.या बार्जेसच्या उपलब्धतेमुळे भारतीय नौदलाच्या परिचालन वचनबद्धतेला चालना मिळेल आणि जेटींच्या बाजूने आणि बाहेरच्या बंदरांवर भारतीय नौदलाच्या जहाजांना वाहतूक, वस्तू / दारूगोळा उतरवणे सुलभ होईल
या  बार्जेसची रचना  स्वदेशी असून  संबंधित नौदल नियम आणि भारतीय नौवहन नोंदणीचे नियमन अंतर्गत तयार केले आहेत. नौदल विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळा, विशाखापट्टणम येथे डिझाईनच्या  टप्प्यात बार्जची नमुना  चाचणी घेण्यात आली. हे बार्जेस केंद्र  सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाचे गौरवशाली  ध्वजवाहक आहेत.

***

SonalT/SushamaK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2064068) Visitor Counter : 50