सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
महाराष्ट्रातील काही जाती/समुदायांचा ओबीसींच्या केंद्रीय यादीत समावेश करण्यासाठी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने केंद्र सरकारला दिला सल्ला
Posted On:
09 OCT 2024 9:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर 2024
राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने (NCBC) 9 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्र सरकारला, महाराष्ट्र राज्यासाठी (i) लोढ, लोढा, लोधी (ii) बडगुजर (iii) सूर्यवंशी गुजर (iv) लेवे गुजर, रेवे गुजर, रेवा गुजर (v) डांगरी (vi) भोयर, पवार (vii) कापेवार, मुन्नार कापेवार, मुन्नार कापू, तेलंगा, तेलंगी, पेंटारेड्डी, बुकेकरी या जाती/समुदायांचा इतर मागासवर्गीय (ओबीसी) केंद्रीय यादीत समावेश करण्याबाबत आपला सल्ला दिला आहे.
राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज गंगाराम अहिर आणि सदस्य भुवन भूषण कमल यांचा समावेश असलेल्या आयोगाच्या दोन सदस्यीय पीठाने या समावेशाबाबत 17 ऑक्टोबर 2023 आणि 26 जुलै 2024 रोजी मुंबईत सुनावणी घेतली.
महाराष्ट्र राज्यासाठी ओबीसींच्या केंद्रीय यादीत वरील जातींचा समावेश करण्यासाठी केंद्र सरकारला सल्ला देण्याचा अंतिम निर्णय 8 ऑक्टोबर 2024 रोजी घेण्यात आला.
* * *
N.Chitale/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2063687)
Visitor Counter : 65