आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आरोग्य सेवा क्षेत्राशी संबंधित संशोधन सुविधांमध्ये सौर उर्जेचा वापर वाढवण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाच्या विद्युत व्यापार निगम सोबत केला सामंजस्य करार


हे सहकार्य म्हणजे भारतातील आरोग्य सेवा संशोधन क्षेत्रात शाश्वत ऊर्जेचा अवलंब करण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल

Posted On: 04 OCT 2024 3:55PM by PIB Mumbai

 

पंतप्रधानांच्या “आत्मनिर्भर भारत” आणि स्वच्छ, हरित भविष्याच्या संकल्पनेला अधोरेखित करत भारताच्या आरोग्यसेवा आणि संशोधन क्षेत्रात शाश्वत ऊर्जेला चालना देण्यासाठी  भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर ) राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ विद्युत व्यापार निगम (एनव्हीव्हीएन) सोबत एका महत्वपूर्ण सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.या भागीदारीचे उद्दिष्ट देशभरातील भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व संस्थांसाठी सौरऊर्जेचा वापर करणे, तसेच अक्षय ऊर्जा आणि शाश्वत विकासाकडे नेणाऱ्या भारताच्या प्रयत्नांना पाठबळ  देणे हे आहे.

या करारांतर्गत देशभरातील15 विविध आयसीएमआर संस्थांमध्ये एनव्हीव्हीएन  4,559 केडब्ल्यू  इतक्या एकत्रित क्षमतेच्या छतावरील सोलर पॅनेल्सचा पुरवठा,ही पॅनेल्स  स्थापित करेल,तसेच त्याच्या चाचण्या आणि देखभालही  करेल.यासोबतच या  प्रकल्पाद्वारे ग्रीड-कनेक्टेड सौर प्रकल्पांसाठी वीज खरेदी करारही झाला आहे (PPA)ज्यात  पुढील 25 वर्षांसाठी सौर दर निश्चित करणे, दीर्घकालीन खर्चाची कार्यक्षमता दाखविणे तसेच दीर्घकाळ आयसीएमआर मधील ऑपरेशन्ससाठी सेवा सुनिश्चित करणे या बाबी देखील समाविष्ट आहेत.

या प्रकल्पांतर्गत सात संस्थांना या आधीच सौरऊर्जेचा लाभ होत असून एनव्हीव्हीएन  सोबतचा हा सामंजस्य करार अतिरिक्त सुविधांसाठी सौरऊर्जेसाठी प्रयत्न वाढवेल, ज्यामुळे आयसीएमआरचा कार्बन फूटप्रिंट आणि ऊर्जा खर्च लक्षणीयरीत्या कमी होईल.

ही भागीदारी भारताच्या राष्ट्रीय अक्षय ऊर्जा उद्दिष्टांना प्रभावीपणे साध्य करत असून, आरोग्य सेवेतील संशोधनाच्या शाश्वत भविष्याला चालना देत आहे आणि आयसीएमआरला जैव वैद्यकीय क्षेत्रात हरित ऊर्जा अंगीकारण्यात  अग्रेसर राहण्याची संधी उपलब्ध करून देते.

***

N.Chitale/S.Patgaonkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2062172) Visitor Counter : 43


Read this release in: Urdu , English , Hindi , Tamil