पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने पर्यावरण विषयक उपक्रमासाठी लाईफ (LIFE) अंतर्गत इकोमार्क नियमांची अधिसूचना केली जारी
पर्यावरण विषयक कठोर मानकांसह उत्पादनांचा शाश्वत वापर आणि पर्यावरण पूरक उत्पादनाला प्रोत्साहन देणे, हे इकोमार्क योजनेचे उद्दिष्ट
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळा (CPCB) द्वारे भारतीय मानक ब्युरो (BIS) च्या भागीदारीने योजना लागू केली जाणार
Posted On:
04 OCT 2024 12:05PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 साली घोषित केलेल्या लाइफ, म्हणजेच LiFE (पर्यावरण पूरक जीवनशैली) मिशनच्या अनुषंगाने, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने 26 सप्टेंबर 2024 रोजी ‘इकोमार्क’ नियम अधिसूचित केले. हे नियम हे 1991 सालच्या ‘इकोमार्क’ योजनेची जागा घेतील.
ही योजना, लाईफ (LIFE) च्या तत्वांना अनुसरून, पर्यावरण पूरक उत्पादनांच्या मागणीला, ऊर्जा बचतीला, साधन संपत्तीच्या कार्यक्षमतेला आणि चक्राकार अर्थव्यवस्थेला चालना देईल. ही उत्पादनांवरील अचूक लेबलिंगवर भर देत, उत्पादनाबद्दल दिशाभूल करणाऱ्या माहितीला प्रतिबंध करणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
इकोमार्क योजनेंतर्गत मान्यताप्राप्त उत्पादने विशिष्ट पर्यावरण विषयक निकषांचे पालन करतील, आणि पर्यावरणावरील किमान प्रभाव सुनिश्चित करतील. ही योजना पर्यावरण विषयक समस्यांबद्दल ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करेल आणि उत्पादनांच्या शाश्वत वापराला प्रोत्साहन देईल. तसेच उत्पादकांना पर्यावरणपूरक उत्पादनाकडे वळायला प्रवृत्त करेल.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळा (CPCB) द्वारे भारतीय मानक ब्युरो (BIS) च्या भागीदारीने ही योजना लागू केली जाईल.
ही योजना शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यामध्ये, तसेच वैयक्तिक आणि सामुहिक निर्णय प्रक्रीये द्वारे भारतामध्ये उत्पादनांच्या शाश्वत वापरला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने महत्वाचे पाउल ठरेल. ही योजना जागतिक शाश्वत उद्दिष्टांना सुसंगत असून, पर्यावरणाचे जतन आणि संरक्षण करण्या प्रति सरकारची वचनबद्धता प्रतिबिंबित करते.
राजपत्रातील अधिसूचना पुढील लिंक वर पाहता येईल:
https://moef.gov.in/storage/tender/1727787383.pdf
***
S.Tupe/R.Agashe/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2061976)
Visitor Counter : 89