भारतीय स्पर्धा आयोग
azadi ka amrit mahotsav

मॅनकाइंड फार्मा लिमिटेड द्वारे भारत सिरम्स आणि व्हॅक्सिन्स लिमिटेडच्या अधिग्रहणाला भारतीय स्पर्धा आयोगाची मंजुरी

Posted On: 02 OCT 2024 2:16PM by PIB Mumbai

 

भारतीय स्पर्धा आयोगाने मॅनकाइंड फार्मा लिमिटेड द्वारे भारत सिरम्स आणि व्हॅक्सिन्स लिमिटेडच्या अधिग्रहणाला मान्यता दिली आहे. प्रस्तावित व्यवहारात मॅनकाइंड फार्मा लिमिटेड (मॅनकाइंड) (प्रस्तावित संगती) द्वारे भारत सिरम्स आणि व्हॅक्सिन्स लिमिटेड (बीएसव्ही) च्या 100% शेअरहोल्डिंगचा (समभाग संपादन) समावेश आहे.

मॅनकाइंड ही एक सार्वजनिक क्षेत्रातील सूचीबद्ध कंपनी असून, विविध दुर्धर आणि जुनाट आजारांवरील उपचारात्मक क्षेत्रांमध्ये तसेच, कंडोम, आपत्कालीन गर्भनिरोधक, गर्भधारणा चाचणी, जीवनसत्त्वे, खनिजे, पोषक द्रव्ये, अँटासिड्स आणि पुरळ-विरोधी उत्पादने, यासारख्या अनेक ग्राहक केंद्रित आरोग्य सेवा उत्पादन क्षेत्रात, ही कंपनी फार्मास्युटिकल फिनिश्ड डोसेज फॉर्म्युलेशन (FDFs) च्या विविध श्रेणींचा विकास, उत्पादन आणि विपणन करते. आपल्या उपकंपन्यांच्या माध्यमातून, मॅनकाइंड कंपनी, सक्रीय फार्मास्युटिकल घटकांचे उत्पादन आणि विक्री (APIs), फार्मास्युटिकल मध्यस्थ आणि फार्मास्युटिकल उत्पादनांसाठी पॅकेजिंग उत्पादने, यासारखे इतर उद्योग करते.

बीएसव्ही, आपल्या उपकंपन्यांसह, संशोधन, विकास, परवाना, उत्पादन, आयात, निर्यात, विपणन, तसेच (a) FDFs आणि API (b) जैव तंत्रज्ञान आणि जीवशास्त्रीय फॉर्म्युलेशन आणि/किंवा API (c) अन्न आणि आरोग्य पूरक (d) वैद्यकीय उपकरणे आणि (e) आयुर्वेदिक औषधे, या उत्पादनांचे वितरण, तसेच स्त्रीरोग, इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन, अतिदक्षता आणि/किंवा मानवी वापरासाठी आपत्कालीन औषधे यासारख्या उपचारात्मक क्षेत्रात काम करते.

भारतात, BSV (BSV मध्ये विलीन होण्याच्या प्रक्रियेत असलेल्या BSV फार्मा प्रायव्हेट लिमिटेड, या आपल्या संपूर्ण मालकीच्या भारतीय उपकंपनीसह) या कंपनीचे कामकाज, महिलांचे आरोग्य, अतिदक्षता, IUI-IVF आणि आपत्कालीन औषध या उपचारात्मक क्षेत्रांमध्ये जैविक, जैवतंत्रज्ञान  आणि फार्मास्युटिकल उत्पादनांच्या श्रेणींचा विकास, उत्पादन आणि विपणन यापुरते  मर्यादित आहे.

आयोगाच्या निर्देशांचा सविस्तर मसुदा जारी केला जाईल.

***

S.Patil/R.Agashe/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2061230) Visitor Counter : 42


Read this release in: Tamil , Telugu , English , Urdu , Hindi