संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

भारतीय सैन्यदलातर्फे ‘लष्‍करी क्रीडा परिषदे’चे आयोजन

Posted On: 30 SEP 2024 8:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 सप्‍टेंबर 2024

 

भारतीय सैन्यदलाच्यावतीने आज बहुप्रतीक्षित "लष्‍करी क्रीडा  परिषदे” चे आयोजन करण्यात आले.  यात  देशाच्‍या क्रीडा परिसंस्थेमध्ये भारतीय सैन्याची भूमिका अधोरेखित करण्यात आली. 2036 मध्ये होवू घातलेल्‍या ऑलिम्पिक स्पर्धांचे यजमानपद भूषवण्यासाठी भारत सज्ज असताना, आजच्या  लष्‍करी क्रीडा परिषदेने या प्रयत्नांना संरेखित करण्यासाठी आणि या राष्ट्रीय मोहिमेत योगदान देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ म्हणून काम केले. विविध राष्ट्रीय भागीदारांसह सहकार्य वाढविण्यावर भर देऊन, भारताच्या जागतिक क्रीडा आकांक्षा वाढवण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक संघटना, भारतीय क्रीडा प्राधिकरण (एसएआय) आणि राष्ट्रीय क्रीडा महासंघ यांच्यासोबत सहयोगात्मक धोरणे आखण्याच्या महत्त्वावर या परिषदेत भर देण्यात आला.

या परिषदेला कामगार आणि रोजगार मंत्री आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडविया, राजस्थानचे उद्योग आणि वाणिज्य मंत्री आणि युवा मंत्री  निवृत्त कर्नल राज्यवर्धनसिंह राठोड  उपस्थित होते. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे देखील  कार्यक्रमाला उपस्थित होते.

  

कर्नल राज्यवर्धनसिंह राठोड, यांनी आपल्या मुख्य भाषणात, ‘खेलो इंडिया’ कार्यक्रमाद्वारे खेळांना चालना देण्यासाठी सरकारच्या उपक्रमांवर प्रकाश टाकला. त्यांनी 2036 पर्यंत ऑलिम्पिकमध्ये भारताला  जास्तीत जास्त पदके मिळवता यावीत, यासंबंधी  एक दृष्टीकोन मांडला आणि  उत्कृष्ट केंद्रे तयार करण्याचे समर्थन केले. क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी भारतीय सैन्याच्या योगदानाची त्यांनी दखल घेतली आणि नमूद केले की, भारतीय सैन्य देशाच्या सर्वोच्च पदक विजेत्या संस्थांपैकी एक म्हणून उदयास येत आहे.

उद्घाटनपर भाषणात, डॉ. मनसुख मांडविया यांनी, भारताच्या क्रीडा परिसंस्थेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल भारतीय सैन्याचे कौतुक केले. देशभरातील खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्तपणे बहु-संस्‍थात्मक प्रयत्नांची गरज त्यांनी अधोरेखित केली. डॉ. मांडविया यांनी ऑलिम्पिकमधील यशासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यावर चर्चा केली. त्यामध्ये तळागाळापासून उच्चभ्रू स्तरापर्यंतच्या प्रतिभेचे संगोपन करण्यासाठी अल्पकालीन पंचवार्षिक योजना आणि दीर्घकालीन 25-वर्षीय धोरण, यांचा समावेश आहे.

  

या परिषदेमध्ये भविष्यातील ऑलिम्पिकवर लक्ष केंद्रित करून भारताच्या क्रीडा क्षमतेचा उपयोग करण्याच्या धोरणांचा सखोल शोध घेण्यात आला, उत्कृष्टता साध्य करण्यासाठी तांत्रिक मानके उंचावण्याच्या गरजेवर भर देण्यात आला.

 

* * *

S.Kane/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2060433) Visitor Counter : 10


Read this release in: Telugu , English , Urdu , Hindi , Tamil