अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ऑगस्ट, 2024 (आर्थिक वर्ष 2024-25) पर्यंत केंद्र सरकारच्या लेख्यांचा मासिक आढावा

प्रविष्टि तिथि: 30 SEP 2024 6:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 सप्‍टेंबर 2024

 

केंद्र सरकारच्या ऑगस्ट 2024 पर्यंतच्या मासिक लेख्यांचे संकलन करून अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. यातील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे :-

केंद्र सरकारला ऑगस्ट 2024 पर्यंत 12,17,178 कोटी रुपये (एकूण प्राप्तीच्या 2024-25 च्या संबंधित अर्थसंकल्पीय अंदाजाच्या  38.0% ) प्राप्त झाले आहेत. ऑगस्ट, 2024 पर्यंत  कर महसूलापोटी 8,73,845 कोटी रुपये (केंद्राकडे निव्वळ),प्राप्त झाले असून कराव्यतिरिक्त महसुलापोटी 3,34,467 कोटी रुपये तर कर्जाव्यतिरिक्तच्या भांडवली मिळकतीपैकी कर्जाच्या वसुलीतून  8,866  कोटी रुपये महसूल प्राप्त झाला आहे. केंद्र सरकारने करातील वाट्याचे हस्तांतरण म्हणून राज्य सरकारांना या कालावधीपर्यंत  4,55,717 कोटी रुपये दिले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षीची ही रक्कम  73,235   कोटी रुपयांनी अधिक आहे.

केंद्र सरकारचा एकूण व्यय 16,52,354 कोटी रुपये (2024-25 च्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या  34.3%) आहे, ज्यापैकी महसूल खात्यातून झालेला खर्च 13,51,367 कोटी रुपये आणि भांडवली खात्यातून झालेला खर्च 3,00,987 कोटी रुपये आहे. एकूण महसुली खर्चापैकी, व्याज चुकते करण्यासाठी  4,00,160  कोटी रुपये तर प्रमुख अनुदानाच्या माध्यमातून 1,78,625 कोटी रुपये खर्च झाले आहेत.

 

* * *

S.Kane/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2060377) आगंतुक पटल : 106
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil