संरक्षण मंत्रालय
द इंडियन नेव्ही क्विझ - THINQ 2024
बाद फेऱ्या पूर्ण, अंतिम फेरी येत्या 8 नोव्हेंबरला
Posted On:
28 SEP 2024 11:42AM by PIB Mumbai
इंडियन नेव्ही क्विझ - THINQ24 या प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या एकूण तीन बाद फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. पहिली बाद फेरी 10 सप्टेंबर 2024 रोजी झाली. त्यानंतर तिसरी आणि अखेरची बाद फेरी 25 सप्टेंबर 2024 रोजी झाली. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेच्या या फेऱ्यांमध्ये एकूण 12,655 नोंदणीकृत शालेय संघ सहभागी झाले होते.
या तीन्ही फेऱ्यांमध्ये विजयी होऊन पात्र ठरलेल्या शाळा आता 14-15 ऑक्टोबर 2024 रोजी विभागीय स्पर्धेत सहभागी होतील. ही स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे.
विकसित भारत ही यंदाच्या THINQ 2024 ची संकल्पना आहे. 2047 सालापर्यंत भारताला विकसित राष्ट्रात रूपांतरित करण्याच्या दृष्टीकोनाशी ही स्पर्धा जोडलेली आहे. ही प्रश्नमंजुषा स्पर्धा फक्त विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेत नाही तर युवा वर्गाच्या मनाची मशागत करून राष्ट्र उभारणीतील त्यांच्या भूमिकेबद्दल त्यांना जागरुक करून नव्या उंचीवर पोहोचवणारा एक मंच सुद्धा आहे.
या स्पर्धेची उपांत्य आणि अंतिम फेरी 7 आणि 8 नोव्हेंबर 24 रोजी दक्षिण नौदल कमांडच्या नेतृत्वाखाली केरळ येथील एझिमालाच्या भारतीय नौदल अकादमी या प्रमुख नौदल प्रशिक्षण संस्थेत होणार आहे. 15 जुलै 2024 रोजी या प्रश्नमंजुषेची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली होती.
***
M.Pange/P.Jambhekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2059825)
Visitor Counter : 62