कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग सचिव डॉ. देवेश चतुर्वेदी यांनी नवी दिल्ली येथे जागतिक बँकेचे दक्षिण आशियाई क्षेत्राचे उपाध्यक्ष मार्टिन रायसर यांच्याबरोबर घेतली बैठक

Posted On: 28 SEP 2024 11:57AM by PIB Mumbai

 

कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सचिव डॉ. देवेश चतुर्वेदी यांनी काल नवी दिल्लीतील कृषी भवनात जागतिक बँकेचे दक्षिण आशियाई क्षेत्राचे उपाध्यक्ष मार्टिन रायसर यांच्यासोबत बैठक घेतली. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या प्राधान्यक्रमांवर चर्चा करणे, मृदा आरोग्य, हवामान अनुकूल शेती आणि तसेच डिजिटल शेती यासह सध्या सहयोग सुरू असलेल्या मुद्द्यांवर सहयोग वाढवण्याबाबत चर्चा करणे हा बैठकीचा मुख्य उद्देश होता.

या बैठकीत सचिवांनी जागतिक बँकेच्या शिष्टमंडळाला कृषी क्षेत्रातील सरकारच्या प्राधान्यक्रमांची माहिती दिली.  कडधान्य आणि तेलबियांमध्ये स्वयंपूर्णता मिळविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, तसेच सरकार शाश्वत शेतीला चालना देत आहे, लहान शेतजमिनीच्या आव्हानावर मात करण्यासाठी धोरणे राबवत आहे, आणि शेतकऱ्यांना सेवा प्रदान करण्यासाठी धोरणे राबवत आहेत, अशी माहिती चतुर्वेदी यांनी दिली.

या बैठकीत, अल्प आणि अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिटचे फायदे सुनिश्चित करण्याच्या मार्गांवरशेतजमीन कमी होत असल्याचे आव्हान; शेतकरी उत्पादक संघटनेला भांडवलाची उपलब्धता; उपलब्ध सुविधांच्या शाश्वत वापरासाठी वर्तणुकीतील बदल व्हावा  या हेतूने डिजिटल आणि मृदा आरोग्य पायाभूत सुविधांचा लाभ घेणे; शाश्वत शेती पद्धती आणि हवामान स्मार्ट तसेच हवामान अनुकूल शेतीचा अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी धोरणे तयार करणे या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2059807) Visitor Counter : 31


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil