आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

देशात मजबूत डिजिटल आरोग्य व्यवस्था स्थापित करण्याच्या दिशेने आयुष्मान भारत डिजिटल अभियानाची तीन वर्षांची परिवर्तनशील वाटचाल


67 कोटींपेक्षा जास्त आयुष्मान भारत आरोग्य खाती उघडली

आयुष्मान भारत आरोग्य खात्यांसोबत आरोग्यविषक इतिहासाच्या 42 कोटींपेक्षा जास्त नोंदी जोडल्या गेल्या

देशभरातील 1.3 लाखांपेक्षा जास्त आरोग्यविषयक सेवा सुविधा संस्था आयुष्मान भारत डिजिटल अभियानाशी जोडल्या गेल्या, यांपैकी 17,000 पेक्षा जास्त खाजगी क्षेत्रातील संस्था

राष्ट्रीय आरोग्य सेवा सुविधा प्रदाता नोंदवही अंतर्गत 3.3 लाख आरोग्यविषयक सेवा सुविधा पुरवणाऱ्या संस्था तसेच 4.7 लाख आरोग्यविषयक सेवा सुविधा क्षेत्रातील व्यावसायिक व्यक्तींची यशस्वी नोंदणी

Posted On: 27 SEP 2024 9:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 सप्‍टेंबर 2024

 

देशात  डिजिटल आरोग्यविषयक पायाभूत सोयीसुविधांची एक मजबूत व्यवस्था उभारण्याच्या ध्येयाने  केंद्र सरकारने 27 सप्टेंबर 2021 रोजी आयुष्मान भारत डिजिटल अभियानाला Ayushman Bharat Digital Mission - ABDM) सुरुवात केली होती. या अभियानाला  तीन वर्षे पूर्ण झाली. अभियानाच्या या तीन वर्षांच्या वाटचालीने आरोग्य सेवा सुलभतेने उपलब्ध व्हाव्यात, त्यांची कार्यक्षमता आणि पारदर्शकता वाढावी याकरता देशाच्या डिजिटल आरोग्य सेवा सुविधांविषयक परिसंस्थेत क्रांती घडवून आणण्याच्या उद्देशाने परिवर्तनकारी वाटचाल सुरू केली आहे. या अभियानाच्या माध्यमातून आरोग्यविषयक डिजिटल गतिविधी परस्परपूरक कार्यान्वयीन क्षमता विकसित करण्यासाठी सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधांचा पूर्ण क्षमतेने लाभ घेतला गेला आहे.  

आयुष्मान भारत डिजिटल अभियानाचे ठळक यश:

या अभियानाअंतर्गत 67 कोटींपेक्षा जास्त आयुष्मान भारत आरोग्य खाती (Ayushman Bharat Health Accounts - ABHA) तयार केली गेली. या खात्यांच्या माध्यमातून नागरिकांना विशिष्ट डिजिटल आरोग्य ओळख क्रमांक प्रदान केला गेला. यामुळे नागरिकांना त्यांच्या आरोग्यविषयक इतिहासाच्या नोंदी सुलभतेने हातळण्याची तसेच गरजेनुसार सामाईक करण्याची सोय उपलब्ध झाली. याव्यतिरिक्त, नागरिकांच्या 42 कोटींपेक्षा जास्त आरोग्यविषयक इतिहासाच्या नोंदी आयुष्मान भारत आरोग्य खात्याशी जोडल्या गेल्या आहेत. यामुळे संबंधित व्यक्तीचा वैद्यकीय इतिहास कोणत्याही अडचणीशिवाय समजून घेणे आणि त्याआधारे त्यांना  आरोग्यविषयक नेमक्या सेवा सुविधा पुरवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे.

या अभियानाचा प्रारंभ झाल्यापासून आजवरच्या वाटचालीत, डिजिटल आरोग्य सेवा सुविधांविषयक परिसंस्थेत खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या व्यवस्थांना सहभागी करून घेण्याच्या बाबतीत लक्षणीय प्रगती झाली आहे. या वाटचालीत आजवर विविध प्रयोगशाळा, ओषध निर्माण, डिजिटल उपाययोजना पुरवणाऱ्या कंपन्यांसह 236 पेक्षा जास्त खाजगी क्षेत्रातील व्यवस्था आयुष्मान भारत डिजिटल अभियानाशी जोडल्या गेल्या असून, त्या आरोग्यविषयक डिजिटल क्रिया प्रक्रिया आणि घडामोडींकरता परस्परपूरक कार्यान्वयीन क्षमता विकसित करण्याच्या प्रक्रियेला हातभार लावू लागल्या आहेत. या अभियानाच्या यशात दिलेल्या योगदानाच्या संदर्भात दिल्ली इथली अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS Delhi),  भोपाळमधील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS Bhopal) यांसारख्या सार्वजनिक क्षेत्रातल्या संस्थांसह अनेक संस्था,  बाह्य रुग्ण विभागाच्या (Outpatient Department - OPD) नोदणींचे दस्तऐवज स्कॅन करून सामाईक करण्याबाबत सर्वात्तम कामगिरी करणाऱ्या संस्था म्हणून उदयाला आल्या आहेत.  अशा सर्व प्रयत्नांसोबतच खाजगी आरोग्य सेवा साखळी क्षेत्राने दिलेले योगदानही आयुष्मान भारत डिजिटल अभियानाच्या यशात महत्त्वाचे ठरले आहे. सद्यस्थितीत देशभरातील 1.3 लाखांपेक्षा वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या संस्था आयुष्मान भारत डिजिटल अभियानाशी जोडल्या गेल्या आहेत, यांपैकी  17,000 पेक्षा जास्त वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या संस्था या खाजगी क्षेत्रातील आहेत.

   

याशिवाय या अभियानाअंतर्गत, आरोग्यविषयक सेवा सुविधा क्षेत्रातील नोंदणीकृत व्यावसायिक व्यक्ती आणि आरोग्यविषयक सेवा सुविधा पुरवणाऱ्या संस्थांचा सर्वंकष माहितीसाठा निर्माण करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय आरोग्य सेवा सुविधा प्रदाता नोंदवहीचा (National Healthcare Providers Registry - NHPR) प्रारंभ केला गेला होता. या नोंदवहीचा प्रारंभ झाल्यापासून आजवर  3.3 लाख आरोग्यविषयक सेवा सुविधा पुरवणाऱ्या संस्था तसेच 4.7 लाख आरोग्यविषयक सेवा सुविधा क्षेत्रातील व्यावसायिक व्यक्तींची यशस्वी नोंदणी झाली आहे.

 

* * *

S.Kakade/T.Pawar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2059696) Visitor Counter : 18


Read this release in: English , Urdu , Hindi