अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत आणि उझबेकिस्तान यांच्यात ताश्कंद येथे द्विपक्षीय गुंतवणूक करारावर स्वाक्षरी


द्विपक्षीय गुंतवणूक करार, प्रासंगिक आंतरराष्ट्रीय पूर्वोदाहरण आणि पद्धतींच्या पार्श्वभूमीवर उझबेकिस्तानच्या भारतातील गुंतवणूकदारांना आणि भारताच्या उझबेकिस्तानमधील गुंतवणूकदारांना योग्य संरक्षण सुनिश्चित करणारा

Posted On: 27 SEP 2024 5:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 सप्‍टेंबर 2024

 

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन आणि उझबेकिस्तानचे उपपंतप्रधान जमशीद खोडजायेव, यांनी आज ताश्कंद येथे भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय गुंतवणूक करारावर (बीआयटी) स्वाक्षरी केली.

भारत आणि उझबेकिस्तान दरम्यानचा हा द्विपक्षीय गुंतवणूक करार), उझबेकिस्तानचे  भारतातील गुंतवणूकदार आणि भारताच्या उझबेकिस्तानमधील गुंतवणूकदारांना  आंतरराष्ट्रीय पूर्वोदाहरण आणि पद्धतींच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ते संरक्षण सुनिश्चित करतो. हा करार मानकांबाबत किमान प्रक्रिया आणि भेदभाव न करण्याची हमी, यामुळे गुंतवणूकदारांना दिलासा देतो आणि त्यांचा विश्वास वाढवतो, त्याचबरोबर लवादाद्वारे विवाद मिटवण्यासाठी स्वतंत्र मंच प्रदान करतो.

बीआयटी, गुंतवणुकीला जप्तीपासून संरक्षण देतो, आणि पारदर्शकता, हस्तांतरण आणि नुकसानभरपाईची तरतूद प्रदान करतो. तथापि, गुंतवणूकदार आणि गुंतवणुकीला संरक्षण प्रदान करताना, योग्य संतुलन राखून दोन्ही देशांचे नियमन करण्याचे अधिकार सुरक्षित ठेवण्यात आले आहेत, ज्यामुळे त्यांना धोरण निश्चितीची पुरेशी संधी मिळेल.

द्विपक्षीय गुंतवणूक करारावरील स्वाक्षरी, आर्थिक सहकार्य वाढवण्याच्या आणि गुंतवणुकीसाठी अधिक मजबूत आणि लवचिक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने दोन्ही देशांची असलेली सामायिक वचनबद्धता प्रतिबिंबित करते. बीआयटीमुळे द्विपक्षीय गुंतवणुकीत वृद्धी होण्याचा मार्ग मोकळा होईल, आणि दोन्ही देशांमधील व्यवसाय आणि अर्थव्यवस्थांना त्याचा लाभ मिळेल.

 

* * *

S.Kakade/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2059572) Visitor Counter : 49


Read this release in: Tamil , Telugu , English , Urdu , Hindi