विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

स्वच्छता ही सेवा 2024 आणि विशेष मोहीम 4.0 अंतर्गत जैवतंत्रज्ञान विभागाने 'व्यापक प्रमाणावरील स्वच्छता मोहीम','एक पेड माँ के नाम' आणि ‘स्वच्छता जनजागृती' विषयक उपक्रम आयोजित केले

Posted On: 27 SEP 2024 3:24PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 सप्‍टेंबर 2024

 

जैवतंत्रज्ञान विभागाने आयोजित केलेल्या 'मोठ्या प्रमाणावरील स्वच्छता मोहीमेत' विभागातील शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. विभागाच्या कर्मचाऱ्यांनी 'आपले राष्ट्र स्वच्छ ठेऊया' या वचनबद्धतेनुसार नवी दिल्लीतील लोधी रोड परिसरातील दयाल सिंग महाविद्यालयाजवळील मार्केट परिसराची स्वच्छता केली. 

   

जैवतंत्रज्ञान विभागाच्या सचिवांनी या सामूहिक स्वच्छता मोहिमेचे नेतृत्व केले. तर सहसचिवांनी कर्मचाऱ्यांना विशेषतः ब्लॅक स्पॉट भागात खोल साफसफाई करण्यास प्रवृत्त केले. त्यांनी बाजार परिसरातील लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले आणि "आम्ही अस्वच्छता करणार नाही, आणि करू देणार नाही" अशी शपथ दिली. 

देशाला हरित आणि स्वच्छ करण्याच्या संकल्पनेनुसार या उपक्रमांतर्गत नवी दिल्लीत जेएलएन स्टेडियम मेट्रो स्टेशनजवळ जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव आणि इतर अधिकाऱ्यांनी 'एक पेड माँ के नाम' या वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन केले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमावर वेळोवेळी स्वतः लक्ष ठेवले. याशिवाय जैवतंत्रज्ञान विभागाच्या सहसचिवांनी जैवतंत्रज्ञान विभाग आणि त्याच्या स्वायत्त संस्था आणि सार्वजनिक उपक्रमांच्या विभाग/वैज्ञानिक संवर्गाने घोषित केलेल्या उपक्रमांच्या तयारी/अंमलबजावणीच्या प्रगतीबाबत आढावा बैठक घेतली.

 

* * *

S.Tupe/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2059445) Visitor Counter : 9